देश

अर्थसंकल्पानंतर बाबा रामदेव यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी काल संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. यावर प्रतिक्रिया देता बाबा रामदेव यांनी मोठी घोषणा केली आहे. 

केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प सर्व समावेशक असल्याचं योग गुरू रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे.

आरोग्याच्या दृष्टीने 137 टक्क्यांच्या वाढीसर 2 लाख 32 हजार कोटींचं बजेट स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच घोषित झालं आहे. याच बरोबर देशात पॅाम ऑईलचे उत्पादन वाढल्यानंतर पतंजली पाच लाख लोकांना रोजगार देईल, असं रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे.

अर्थसंकल्पात सर्वांसाठीच काही ना काही आहे. इम्पोर्ट ड्युटी वाढवण्याबरोबरच देशात वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे उत्पादन, तसेच इतर गोष्टींचे उत्पादन वाढवल्यास देश आत्मनिर्भर बनेल. त्याचबरोबर देशाला मॅन्यूफॅक्चरिंग हब बनवण्याचे मोदींचे स्वप्न पुर्ण झाल्यास अनेकांना रोजगार मिळेल, असंही रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मनसेला धक्का! मनसेच्या या बड्या नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश

“जुने गेले तर नवे कार्यकर्ते उभारी घेतील, सगळ्यांनाच राज ठाकरे होता येत नाही”

“ठाकरे ‘संपत्ती’ लपवण्यात तर धनंजय मुंडे ‘संतती’ लपविण्यात व्यस्त”

अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण करा अन्यथा….- गोपीचंद पडळकर

मराठमोळ्या अजिंक्य रहाणेचा राज्यसभेतही बोलबाला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या