बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चेंबूर, विक्रोळी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना सरकारकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर !

मुंबई | मुंबईत शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय. शहरातल्या विविध भागांत पावसाने रौद्ररुप दाखवलंय. मुंबईच्या चेंबूर आणि विक्रोळी भागामध्ये झालेल्या दुर्घटनांमुळे आत्तापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. या दुर्घटनांमधील मृतांच्या नातेवाईकांना सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे.

चेंबूर, विक्रोळी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्याचप्रमाणे या घटनेमध्ये जखमी झालेल्या नागरिकांवर मोफत उपचार केले जातील, असंही सांगितलं.

मुंबईत काल रात्रीपासून पाऊस सुरू असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: पालिकेच्या नियंत्रण कक्षाकडून सातत्याने माहिती घेत आहेत. तसेच त्यांनी पालिका आयुक्तांकडून बचाव कार्याची माहिती घेतली. एनडीआरएफ, महानगरपालिका, अग्निशामक दल आणि पोलीस यांनी समन्वयाने बचाव कार्य सुरु ठेवावे. जखमींना तातडीने रुग्णालयांत हलवून व्यवस्थित उपचार मिळतील असं पाहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

आजही दिवसभर पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे व कुठेही दुर्घटना घडल्यास त्वरित बचाव कार्य सुरु ठेवावे व मदत पोहचवण्याचे आदेशही उद्धव ठाकरे यांनी दिले. त्याचप्रमाणे मुंबईतील मिठी नदी व इतर मोठ्या नाल्यांलगत पाणी वाढल्यास आसपास राहणाऱ्या रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास होऊ शकतो. हे पाहून त्यांना प्रसंगी स्थलांतरित करण्यात यावं, असंही त्यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

लोकांना तीन-तीन वेळा इशारा दिला होता पण…- किशोरी पडेणेकर

“…अन्यथा मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही”

नरेंद्र मोदींसोबत झालेल्या भेटीत काय चर्चा झाली?, शरद पवार म्हणतात…

पुढील 24 तासात ‘या’ भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

‘कोरोनामुक्त झालेल्यांना टीबीचा धोका’; आरोग्य मंत्रालयानं दिली महत्वाची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More