महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्र्यांनंतर शरद पवार आणि अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन आल्याची माहिती आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. धमक्यांच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.

उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ निवासस्थान उडवून देण्याची धमकी देणारा फोन आल्याचं काल समोर आलं होतं. आता, शरद पवार यांनाही काल भारताबाहेरुन धमकीचा फोन आल्याचं कळतंय.

दुबईहून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक बोलत असल्याचा दावा करणारा फोन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आला होता. त्यामुळे ‘मातोश्री’ निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आलीये.

महत्वाच्या बातम्या-

“70 वर्षांत जे काही उभं केलं होतं, ते सगळं हे विकून टाकणार”

कंगणा राणावतला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून वाय दर्जाची सुरक्षा!

‘मी सुशांत सरांना गांजाचं सेवन करताना पाहिलं होतं’; नोकर दीपेशचा खुलासा

अखेर ‘एमपीएससी’कडून परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर

‘मला महाराष्ट्र आवडतो’; कंगणा राणावतचं मराठीत ट्विट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या