भारत-चीन सैनिकांच्या संघर्षानंतर राऊतांचा मोदींवर गंभीर ओरोप

नवी दिल्ली | भारत-चीन सीमेवर सतत तणाव दिसून येत आहे. अशातच आता अशी माहिती समोर आली आहे की, अरूणाचल प्रदेशजवळील सीमा रेषेजवळ भारत-चीनमध्ये झालेल्या चकमकीत 20 ते 30 भारतीय सैनिक जखमी झाले आहे.

आता या घटनेवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. कारण ही घटना 9 डिसेंबर रोजी घडली, परंतु 12 डिसेंबरला ही घटना समोर आली आहे. यावरून आता शिवसेना(Shivsena) खासदार संजय राऊतांनीही(Sanjay Raut)पंतप्रधान नरेंद्र मोदींना(Narendra Modi) चांगलंच सुनावलं आहे.

हा प्रकार 9 डिसेंबर रोजी प्रकार घडला आहे. देशाच्या सीमा असुरक्षित झाल्या आहेत. चीन तिन्ही बाजूंनी देशात घुसतोय, त्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये सुरक्षेच्याविषयी प्रश्न विचारू पण सध्याची परिस्थिती गंभीर होत चालली आहे, असं राऊत म्हणाले आहेत.

आपलं सरकार राजकारणामध्ये पडल्यानं देशाचे दुश्मन असलेले चीन, पाकिस्तान सीमेवरती धडका मारत आहेत. प्रधानमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांनी देशापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न केला आहे,हे कालच्या घटनेवरून स्पष्ट होत आहे, असा आरोप राऊतांनी केला आहे.

हे प्रकरण शुक्रवारी झालं परंतु ते सोमवारी देशासमोर आलं. जखमी सैनिकांवर आसामच्या गुवाहाटीमध्ये उपचार सुरू आहेत. सत्य काय हे समजायला काही मार्गच नाही. राजकारण कोणत्या पातळीला गेलं आहे हे यावरून दिसत आहे. असा टोलाही त्यांनी भाजपला(BJP) लगावला आहे.

सरकारनं राजकारण बाजूला ठेऊन सीमा प्रश्नांकडं लक्ष दिलं पाहीजे, असं अवाहनही राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-