देश

कोरोनानंतर ‘बर्ड फ्लू’नं वाढवलं भारतीयांचं टेन्शन; या तीन राज्यांमध्ये आहे प्रभाव!

नवी दिल्ली | भारतात कोरोना विषाणूमुळे चिंतेचं वातावरण असतानाच आता ‘बर्ड फ्लू’ची काही प्रकरणं नव्यानं समोर आली आहेत. राजस्थान, केरळ पाठोपाठ आता हिमाचल प्रदेशमध्ये बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

याआधी राजस्थान आणि केरळमध्ये बर्ड फ्लूची प्रकरणं समोर आली होती. केरळच्या कोट्टायम आणि अलपुझा जिल्ह्यात तसेच राजस्थानच्या झालावाड, बिकानेर, अजमेर, जोधपूर, पालीसह सात जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’ची प्रकरणं नोंदवली गेली आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर राजस्थान सरकार सतर्क झाले असून कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली आहे. अजमेरमध्ये कुक्कुटपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर होतो तर भरतपूर येथील जागतिक दर्जाच्या पक्षी अभयारण्यात मोठ्या प्रमाणावर प्रवासी पक्षी येत असल्याने राज्य सरकारच्या चिंतेत भर पडली आहे.

दुसरीकडे हिमाचल प्रदेशमध्ये देखील 1800 पक्ष्यांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्याचा धक्कादायक अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. येत्या काळात या आजारामुळे आणखी अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे तिसऱ्या खेळाडूची कसोटी मालिकेतून माघार

‘…तेव्हा तुमचे मुख्यमंत्री झोपा काढत होते का?’; सुभाष देसाई यांनी भाजपला फटकारलं

तेजस्वी सातपुते यांनी पोलीस दलासाठी घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; गृहमंत्र्यांनीही केलं कौतुक

नागपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांची निवड ऑनलाईन होणार!

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना अखेर अटक!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या