बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नाशिक दुर्घटनेत मुलाच्या मृत्यूनंतर सरकारने दिलेले 10 लाख रुपये घेऊन सून फरार

नाशिक | काही दिवसांपुर्वी नाशिक येथील झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टँक गळती झाल्याची दुःखद घटना समोर आली होती. यामध्ये अनेक रुग्णांचा जीव गेला. या कारणामुळे सरकारने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या परिवाराला 10 लाख रुपये दिले आहेत. मात्र एका महिलेने आपल्या पतीच्या मृत्यूनंतर मिळालेले पैसे घेऊन पळ काढला असून मुलाच्या पालकांना वाऱ्यावर सोडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

21 एप्रिल रोजी सुमारे साडे बाराच्या सुमाऱ्यास झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँकची गळती सुरु झाली होती. या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते. तसेच यातील 150 रुग्ण व्हेंटीलेटरवर होते, तर व्हेंटीलिटर पैकी 21 रुग्ण श्वास गुदमरुन मृत्यू पावले. या मृत झालेल्या व्यक्तींच्या परिवाराला सरकारने 10 लाख रुपयांची मदत दिली आहे.

दरम्यान, नाशिक येथील महाले दाम्पत्याने आपला एकुलता एक मुलगा या दुर्घटनेत गमवला असून त्यांच्या सुनेनं मिळालेली आधार रक्कम घेऊन पळ काढला. यानंतर हतबल झालेल्या महाले दाम्पत्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे मदत याचना केली आहे. महाले यांच्या सुनेनं मुलाच्या आई-वडिलांच्या जबरदस्ती सह्या घेतल्या होत्या.

दरम्यान, संबंधित सुनेनं कागदपत्रांच्या आधारावर शासनाकडून मिळालेली सर्व आर्थिक मदत पळवली आहे. तसेच पैसे हातात पडताच तिनं सासू सासर्‍यांना वाऱ्यावर सोडून पळ काढला आहे. यामुळे संबंधित दाम्पत्य निराधार झालं आहे.

थोडक्यात बातम्या-

“बारामतीकरांनो, पवार घराण्याच्या गुलामगिरीतून मुक्त व्हा”

मिल्खा सिंग यांची भूमिका साकारणारा अभिनेता फरहान अख्तर म्हणाला….

देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 60 हजारात, मृतांचा आकडाही घटला

पप्पा म्हणाले “केसांचा कोंबडा छान दिसतोय”, पाहा प्राजक्ता माळीची वेगळीच हेअरस्टाईल

सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण; वाचा आजचे दर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More