बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आमचं हेलिकाॅप्टर असंच ढगामध्ये सापडलं होतं…”; शरद पवारांनी सांगितला किस्सा

मुंबई | देशाला हादरवून टाकणारी घटना आज घडली आहे. देशाचे पहिले सीडीएस आणि माजी लष्कर प्रमुख बिपीन रावत (Death Of CDS Bipin Rawat) यांच्यासह तब्बल 12 जणांचं हेेेलिकाॅप्टर दुर्घटनेत निधन झालं आहे. या हेलिकाॅप्टर अपघातानं पुन्हा एकदा व्हीआयपींच्या (VIP) सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशातच आता देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांनी आपला एक चित्तथरारक अनुभव सांगितला आहे.

शरद पवार हे अनेक महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते. परिणामी त्यांना नेहमी अत्यंत उच्च दर्जाची सुरक्षा देण्यात येते. जनरल बिपीन रावत यांच्या निधनावर शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. शरद पवार यांनी त्यांच्यासोबत घडलेली एक घटना टीव्ही9 शी बोलताना सांगितली आहे. शरद पवार आपल्या पत्नी आणि एका राज्यमंत्र्यांसह प्रवास करत होते.

पुण्यावरून मुंबईला हेलिकाॅप्टरनं जात होतो. लोणावळा संपून खोपोलीकडं जाताना एक व्हॅली आहे. तिथं अनेक ढग आहेत. त्या ढगामध्ये आमचं हेलीकाॅप्टर सापडलं. मला महाराष्ट्राबद्दल चांगली माहिती असल्यानं मी पायलटला हेलीकाॅप्टर 7 हजार फुट उंचीवरून न्यायला सांगितलं आणि आम्ही वाचलो. अन्यथा आमचंही हेलिकाॅप्टर व्हॅलीमध्ये कुठेतरी जाण्याची शक्यता होती, असं शरद पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, बिपीन रावत यांच्या हेलिकाॅप्टर दर्घटनेतील मृत्यूनंतर देशात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बिपीन रावत यांनी भारतीय लष्कराच्या सामर्थ्याचं दर्शन अनेकदा शत्रू राष्ट्रांना घडवलं होतं. देश त्यांच्या योगदानाला कधीही विसरू शकणार नाही.

थोडक्यात बातम्या 

आधीही असंच घडलं होतं! 6 वर्षापूर्वी ‘त्या’ अपघातात बिपीन रावत थोडक्यात बचावले होते

‘अजिंक्य’पर्व संपण्याच्या वाटेवर?, कसोटी संघाचं उपकर्णधारपद गमावलं

किंग कोहलीला डच्चू! रोहित शर्मा टीम इंडियाचा नवा कर्णधार

“खरंच प्रायश्चित्त करायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी…”

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ मोठे निर्णय; वाचा एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More