Top News क्राईम महाराष्ट्र मुंबई

पत्नीच्या निधनानंतर शेजारच्या मुलीवर जडला जीव, लग्नास नकार देताच केला खुनी खेळ!

photo credit- Pixabay

 मुंबई | राज्यात हत्येचे प्रमाण वाढतं चाललं आहे. अशातच पनवेल तालुक्यात दापोली गावात आई आणि मुलीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना 19 तारखेला शुक्रवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास घडली आहे .

मृत आईचे नाव सुरेखा वानखेडे आणि मुलीचे नाव सुजाता वानखेडे अशी आहेत. या मायलेकींची हत्या त्यांच्या घराशेजारील राहणाऱ्या एका व्यक्तीनेच केली आहे. घरात शिरुन सुरेखा आणि सुजाताची हत्या केली यानंतर आरोपी मागच्या खिडीकीतून पळून गेला असल्याची माहिती समजत आहे.

आरोपीच्या पत्नीचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. एकटा असलेल्या आरोपीने 18 वर्षांच्या सुजाताला लग्नाची इच्छा व्यक्त केली होती. मात्र सुजाताच्या घरच्यांनी या गोष्टीला नकार दिला. याचाच राग मनात धरुन आरोपीने हे कृत्य केलं असल्याचं समजत आहे. घटना घडली तेव्हा सुरेखाचा पतीही घरात होता. त्यावेळी सुरेखाचा नवरा जखमी झाला. त्याला पनवेलमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पनवेल शहरातील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घडलेल्या घटनेमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा तपास अधिक तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

कॉलेजला गेलेल्या तरुणीचा मृतदेह सापडला कालव्यात, घरातलाच आरोपी निघाल्याने खळबळ!

‘…पण इतिहास चुकीचा होता’; शिवजयंतीनिमित्त वीरूचं खास ट्विट

तबलिगी प्रकरणाची महाराष्ट्रात पुनरावृत्ती?; तृप्ती देसाईंचे राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

सावधान! राज्यातील या दोन जिल्ह्यात सापडले कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण

संजय राठोड यांच्या चौकशीबाबत पुणे पोलिसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या