बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आईच्या मृत्यूनंतर मुलांनी वडिलांसोबत मिळून बनवलं आईचं मंदिर!

नवी दिल्ली | मध्य प्रदेशमधील शाजापूर जिल्ह्यात एका कुटुंबातील मुलांनी आपल्या वडिलांसोबत मिळून आपल्या आईचं मंदिर उभारलं. यानंतर सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे. देशात असलेल्या मंदिरांमुळे भारताला जास्त शोभा आहे. अनेक वेगवेगळे मंदिरं असली तरी आईचं मंदिर हे पहिलंच असेल.

कोरोनाने अनेकांच्या जवळच्या व्यक्तीचा जीव घेतला. कोणाच्या आईचं निधन झालं तर कोणाच्या वडिलांचं. मध्य प्रदेशमधील या कुटुंबाची कहाणीसुद्धा अशीच काहीशी आहे. या कुटुंबातील प्रमुख नारायण आपल्या मुलांसोबत आणि पत्नीसोबत राहत होते.

कोरोना काळात नारायण यांच्या पत्नी गीताबाई यांना कोरोनाची लागण झाली. त्यांची प्रकृत्ती प्रचंड खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला. 27 एप्रिल 2021ला त्यांचा मृत्यू झाल्याने घरात शोकांतिका पसरली.

दरम्यान, गीताबाई या धार्मिक होत्या. सतत भजन-किर्तनमध्ये गुंग असायच्या. त्यामुळे एकदा चर्चा चालू असताना मुलांनी आणि नारायण यांनी मिळून आईचं मंदिर बांधायचं ठरवलं. तसेच मृत्यूच्या दोन महिन्यांनी त्यांची मुर्ती घरी आणली आणि मंदिर उभारण्यात आलं .

थोडक्यात बातम्या-

HDFC बँकेचा मोठा निर्णय; ग्रामीण भागातील तरुणांना नोकरीची संधी

काँग्रेसला दिलेला शब्द फडणवीसांनी पाळला; राज्यसभा पोटनिवडणुकीतून भाजपची माघार

धर्मांतराचं रॅकेट चालवणाऱ्या तरुणाला नाशिकमधून अटक; तपासात धक्कादायक माहिती समोर

बिकीनी घालून तरुणाचा भररस्त्यात भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

कोरोना लसीला विरोध करणाऱ्या ‘या’ माॅडेलची मृत्यूशी झूंज; लोकांना केलं लस घेण्याचं आवाहन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More