Top News देश

“मोतीलाल वोरांचं आयुष्य हे जनसेवेचं आणि काँग्रेसच्या विचारांप्रती असलेल्या निष्ठेचं आर्दश उदाहरण”

नवी दिल्ली | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचं काल 21 डिसेंबर रोजी निधन झालं आहे. मोतीलाल वोरा यांचे आयुष्य हे जनसेवा व काँग्रेसच्या विचारांप्रती असलेली निष्ठा यांचे आदर्श उदाहरण होतं. असं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. वोरा यांच्या निधनामुळे छत्तीसगढ सरकारने सोमवार ते बुधवारपर्यंत तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

सोनिया गांधी म्हणाल्या की, “मोतीलाल वोरा यांनी केलेले नि:स्वार्थ कार्य व बहुमोल मार्गदर्शन यांची उणीव यापुढे आम्हाला नेहमीच जाणवत राहिल. मोतीलाल व्होरा यांच्या निधनामुळे छत्तीसगढ सरकारतर्फे पाळण्यात येणाऱ्या तीन दिवसांच्या दुखवट्यात शासकीय इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणले जातील. या कालावधीत कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार नाही.”

मोतीलाल वोरा यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना दिल्लीतील फोर्टिस रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास सोडला.

दरम्यान, मोतीलाल वोरा यांनी काँग्रेसच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्याचप्रमाणे ते मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री देखील होते.

थोडक्यात बातम्य-

कुत्र्याच्या साखळीने गळा आवळला; हत्येचं कारण ऐकून सुन्न व्हाल!

‘…त्या वेळी तुम्ही काय करणार? कुठं तोंड लपविणार?’; गुरूवाणीचा अर्थ सांगत मोदींवर निशाणा

“कोरोनाने सांगितलं आहे का मी दिवसा झोपेल आणि रात्री बाहेर येईल”

…तर ‘त्या’ खाजगी प्रयोगशाळांची मान्यता होणार रद्द- महापौर

कोरोना विषाणूचे दुष्परिणाम वाढले; ‘या’ रूग्णांनी काळजी घ्यावी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या