बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

घटस्फोटानंतर समंथाने केलं तिचं स्वप्न पुर्ण, फोटो शेअर करत म्हणाली…

मुंबई | सर्वांच्या मनावर राज्य करणारी साऊथ इंडियन अभिनेत्री समंथा सध्या एका वेगळ्याच विषयामुळे चर्चेत आली आहे. समंथाने 2017 साली साऊथ इंडियन अभिनेता नागा चैतन्य याच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नाच्या काही काळानंतर त्यांच्यात वाद होऊ लागल्याने दोघांनी घटस्फोट घेतला. समंथा या दिवसांमध्ये चार धाम यात्रेला गेली होती. तसेच या यात्रेला जाणं तिचं स्वप्न होतं, असं तिनं म्हटलं आहे.

समंथाने तिच्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती शिल्पा रेड्डीसोबत हेलिकॉप्टरजवळ पोज देताना दिसत आहे. आमची यात्रा संपली असल्याचे या पोस्टमधून तिनं सांगितलं आहे. विलक्षण प्रवास संपला चारधाम यात्रा गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ, हिमालय बद्दल आकर्षण वाटत आहे. पृथ्वीवरील स्वर्गात जाणं स्वप्न होतं, महान रहस्याचे ठिकाण, देवांचे निवासस्थान असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

मला जे वाटलं होतं ते शांत आणि भव्य मिथक आणि वास्तव यांच्यातील गुंतागुंतीचे गोंधळ हिमालयाला माझ्या हृदयात एक विशेष स्थान असेल आणि ते आणखी एक खास आहे कारण मला तुमच्यासोबत अनुभवायची संधी मिळाली आहे, असे देखील तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा प्रभू आज काल तुफान चर्चेत आहे. नागा चैतन्य सोबत विभक्त झाल्यानंतर समंथा अनेक कारणांमुळे चर्चेत येत आहे.

थोडक्यात बातम्या-

“आमच्याकडे तर तक्रारदारच गायब आहे”, मुख्यमंत्र्यांनी लगावला परमबीर सिंगांना टोला

‘आर्यन खानला गांजा दिला होता, पण….’, अनन्या पांडेचा मोठा खुलासा

‘…ते आपल्याला मोडून काढायचं आहे’, मुख्यमंत्र्यांचा ‘हा’ महत्त्वाचा निर्धार

देशातील कोरोना रूग्णसंख्येतील चढउतार सुरूच, पाहा गेल्या 24 तासातील आकडेवारी

एसटी प्रवास महागणार, इंधन दरवाढीचा आता प्रवाशांनाही बसणार मोठा फटका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More