बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

घटस्फोटानंतर समंथाची पुन्हा एकदा न्यायालयात धाव, कारण…

मुंबई | सर्वांच्या मनावर राज्य करणारी साऊथ इंडियन अभिनेत्री समंथा सध्या एका वेगळ्याच विषयामुळे चर्चेत आली आहे. समंथाने 2017 साली साऊथ इंडियन अभिनेता नागा चैतन्य याच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नाच्या काही काळानंतर त्यांच्यात वाद होऊ लागल्याने दोघांनी घटस्फोट घेतला. मात्र आता समंथाने पुन्हा एकदा न्यायालयात धाव घेतली आहे.

घटस्फोटानंतर समंथाने कोट्यवधींची पोटगी नाकारली आहे. मात्र यावेळी समंथाने युट्यूबर्सवर आरोप केला आहे. घटस्फोटानंतर समंथा आणि नागा चैतन्यबाबत अनेक चर्चा रंगत आहेत. अशातच समंथाने युट्यूबर्सवर अब्रूनुकसानीचा आरोप केला आहे.

यामध्ये अनेक प्रसिद्ध युट्यूब चॅनेल्सचा समावेश आहे. सुमन टिव्ही, तेलूगु पाॅल्यूलर, अशा अनेक मोठ्या यूट्यूब चॅनेल्सना समंथाची नोटीस पाठवण्यात आली आहे.

दरम्यान, समंथा आणि नागाचैतन्यच्या घटस्फोटावर अनेकांनी नाराजगी व्यक्त केली आहे. सर्वात जास्त गोड म्हणून ओळखली जाणारी जोडी अचानक विभक्त झाल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. यानंतर अनेकांनी समंथाला दोषी ठरवत अनेक चर्चा उठवल्या होत्या. त्यामुळेच समंथाने मोठा निर्णय घेत थेट न्यायालयात धाव घेतली.

थोडक्यात बातम्या-

लोकलने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून रेल्वेने वसूल केला तब्बल एवढ्या कोटींचा दंड

SBI नंतर आता पेटीएम पेमेंट्स बँकेला RBI चा दणका; केली ‘ही’ मोठी कारवाई

‘…नाहीतर हे आयुष्यभराचं ग्रहण असतं’, धनंजय मुंडेंनी सांगितली मन की बात

“शिवसेना सोडणाऱ्यांच्या यादीत पहिलं नाव रामदास कदम यांचं होतं”

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More