निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंचं मोठं पाऊल!
मुंबई | एकीकडे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतांना दुसरीकडे निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह यावर निर्णय दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मोठं पाऊल उचलल्याचं समजतंय.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची पहिलीच जाहीर सभा होणार आहे. 5 मार्चला उद्धव ठाकरे यांची सभा कोकणातील खेडमध्ये पार पडणार आहे.
5 मार्च ला रत्नागिरी जिह्यातील खेडमध्ये होळी मैदान येथे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे काय बोलणार याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे.
राज्यभरातून आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या सभेत येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यभर दौरा करण्याचा निर्णय घेत असतांना सुरुवात कोकणातून करण्यात आली आहे. त्याची तयारी शिवसैनिकांनी सुरू केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.