बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चहलला संघातून वगळ्यावर पत्नी धनश्री वर्माची ‘ती’ पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई | आंतरराष्ट्रीय टी-20 विश्वचषकसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.   17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर पर्यंत विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. विश्वचषकासाठी नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मात्र मागील चार वर्षापासुन भारतीय संघात खेळणारा यजुवेंद्र चहलला डच्चू देण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं आहे. यावर चहलने कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी त्याची पत्नी धनश्री वर्माने एक पोस्ट केली आहे.

विश्वचषकासाठी क्रिकेटपटू विराट कोहलीकडे कर्णधाराची धूरा देण्यात आली आहे तर रोहित शर्माकडे उपकर्णधारपद असणार आहे. मात्र यजुवेंद्र चहलची भारतीय संघात निवड न झाल्याने धनश्रीने नाराजी व्यक्त केली आहे. आई म्हणते, ही वेळही निघून जाईल. ताठ मानेने जगा, कारण कौशल्य आणि चांगली कर्म नेहमीच साथ देतात. देव कायमच महान असतो, असं धनश्रीने आपल्या इंस्ट्राग्रामच्या स्टोरीत म्हटलं आहे.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीकडे बीसीसीआयने भारतीय संघात मेन्टॉरची जबाबदारी दिली आहे. परंतु विराटचा हुकमी एक्का मानला जाणारा चहल विश्वचषकामध्ये खेळताना दिसणार नाही आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनाही जबरदस्त धक्का बसला आहे.

दरम्यान, चहलबरोबर भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनलाही संघातून वगळण्यात आलं आहे. तर तब्बल चार वर्षांनंतर फीरकीपटू रविचंद्रन अश्विनला संघात स्थान देण्यात आलं आहे. इशान किशन, सुर्यकुमार यादव, राहुल चहर, वरूण चक्रवर्ती या नवख्या खेळाडूंना संघात सामील करून घेण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“देशाचं चित्र बदलतंय, भारताची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने”

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

‘राणे कुटुंबाची नाही आता क्राईम ब्रांचच्या….’; लुकआऊट नोटीसवरून नितेश राणे संतापले

‘दीड वर्षाचं काम 15 दिवसात करणार’; नितीन गडकरींनी दिला शब्द

नाशिक पोलिसांचा मास्टर प्लॅन! हेल्मेट न घालणं जीवावर नाही तर कानावर बेतणार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More