बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात साथीच्या रोगांचा कहर! ‘या’ जिल्ह्यात आढळले तब्बल 882 रूग्ण

नाशिक | परतीच्या पावसाने राज्यात पाठ फिरवल्यानंतरही डेंग्यू आणि चिकनगुनियाचा धोका वाढला आहे. कोरोना कहर कमी होत असताना राज्यात चिकनगुनियाच्या आजाराने डोकं वर काढल्याचं चित्र दिसत आहेत. राज्यातील सर्वात जास्त रूग्ण नाशिक महानगरपालिकेत आढळून आल्यानंतर नागरिकांची चिंता वाढलेली दिसून येत आहे.

आरोग्य सेवा नाशिक मंडळाच्या एका अहवालामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. जानेवारी ते 10 ऑक्टोबर या दरम्यान नाशिकमध्ये 882 रूग्ण आढळून आले आहेत. 2018 वर्षाचा अपवाद वगळता मागील पाच वर्षात चिकनगुनियाच्या रूग्णांनी तीन आकडी संख्या सुद्धा गाठली नव्हती. जी फक्त गेल्या 10 महिन्यात 882 इतकी झाली आहे.

जानेवारी ते ऑक्टोबर या महिन्यात 3847 जणांचे नमुने तपाण्यात आले होते. नाशिक शहरातील 2295 नमुन्यांपैकी 634 तर नाशिक ग्रामिण भागातील 1494 पैकी 220 जणांचे नमुने सकारात्मक आले होते. तर ऑक्टोबर महिन्यात नाशिकमध्ये  181 जणांची तपासणी केली होती. त्यामध्ये चिकनगुनियाचे 30 रूग्ण आढळून आले होते. त्यामधील 23 शहरातील तर 7 ग्रामीण क्षेत्रातील रूग्ण होते. दिलासादायक बाब म्हणजे अजूनही या महिन्यात एकही चिकनगुनिया रूग्णांचा मृत्यू झाला नाही.

दरम्यान, नाशिकमध्ये 2016 वर्षात चिकनगुनियाचे 55 रूग्ण आढळून आले होते. ती संख्या पुढील वर्षात 58 वर गेली होती. 2018 साली 180 जणांना चिकनगुनिया झाला होता. 2019 साली तीच संख्या 19 वर आली होती. तर 2020 मध्ये 84 आणि 2021 वर्षामधील चिकनगुनियाची संख्या 882 वर गेली आहे.

थोडक्यात बातम्या-

दोन वर्षात शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना काय मिळालं? निलेश राणेंची शरद पवारांवर जळजळीत टिका

‘तुम्ही पेट्रोल मला द्या ना…’, पेट्रोलपंपावर गायलेल्या गाण्याचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

‘या’ वर्षीही भेटणार वाहतूक करात सवलत?; ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

विमानाचा रंग पांढराच का असतो?, ‘हे’ आहे त्यामागचं विशेष कारण

पुणेकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ दिवशी राहणार पाणीपुरवठा पुर्णपणे बंद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More