बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नाशिकच्या घटनेनंतर पुणे महापालिकेला खडबडून जाग; महापौरांनी दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

पुणे | नाशिकमधील महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे 22 रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली होती. ऑक्सिजन गळती झाल्यामुळे रूग्णालयातील ऑक्सिजनचा दाब कमी झाला आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रूग्णांचा मृत्यु झाला होता. या घटनेबाबत देशभरातून हळहळ व्यक्त होत होती. आता या घटनेनंतर पुणे महापालिकेला खडबडून जाग आली आहे.

पुणे शहरातील सर्व हॉस्पिटलच्या ऑक्सिजन यंत्रणेचे तातडीने ऑडिट करण्याचे आदेश पुणे महानगरपालिका प्रशासनाला बैठक घेऊन दिले आहेत, असं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ यांनी सांगितलं आहे. शिवाय या संदर्भात तातडीने अहवाल सादर करावा, अशा सूचनाही मुरलीधर मोहळ यांनी दिली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे.

ऑक्सिजन किंवा रेमडेसिविर यांच्या पुरवठ्याची जबाबदारी ज्यांच्याकडे असेल ती त्यांनी पूर्ण क्षमतेने उभी करावी, अशी मागणी आम्ही राज्य सरकारकडे केली आहे. राज्य सरकारने पुण्याचे नाशिक होऊ देऊ नये, असं मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारांंशी बोलताना  म्हटलं आहे.

दरम्यान, पुणे शहरात खासगी व सरकारी हॉस्पिटल मिळून साधारण 250 मेट्रिक टन ऑक्सिजन दररोज लागतो. मात्र गेल्या 3 ते 4 दिवसांपासून त्यात कमतरता निर्माण झाली आहे. यातच नाशिक सारखी घटना घडल्यानं मोठी समस्या उद्भवू शकते. त्यामुळे ऑक्सिजन यंत्रणेचे फायर ऑडिट करणं गरजेचं आहे.

थोडक्यात बातम्या-

दिवसाढवळ्या झालेल्या गँगवॉरने पुणे हादरलं; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ आला समोर

‘भिक मागा, चोरी करा पण रुग्णांना ऑक्सिजन द्या’; दिल्ली उच्च न्यायालयाने मोदी सरकारला सुनावलं

‘महाराष्ट्राला 500 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा व्हावा’; राजेश टोपे यांची मोदींकडे मोठी मागणी

Remdesivir बनवणाऱ्या कंपन्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

खळबळजनक! एकाच रूग्णालयातील 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला कोरोनाची लागण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More