बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुम्हाला सुट्टी नाही, लवकरच हिशोब चुकता करणार”; जो बायडन संतापले!

वॉशिंग्टन | तालिबान्यांनी बंदुकीच्या जोरावर अफगाणिस्तानच्या भू-प्रदेशावर ताबा मिळवला आहे. तालिबान्यांच्या हिंसक कृतीला घाबरून देशातील अनेक नागरिक देश सोडत आहेत. नागरिक मिळेल त्या पर्यायाचा वापर करून पळ काढतायेत. काल काबूल विमानतळावर नागरिकांची देशाबाहेर पडण्यासाठी गर्दी जमा झाली असता विमानतळ स्फोटांनी हादरून गेले. या आत्मघातकी स्फोटक हल्ल्यात 60 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, 140 पेक्षा अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.

काबूल विमानतळावरील स्फोटक हल्ल्यात अमेरिकेच्या 14 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन संतापले आहेत. ज्यांनी हे हल्ले घडवून आणले आहेत आणि ज्यांनी अमेरिकेला त्रास देण्याचा विचार केला आहे, त्यांनी हे ध्यानात घ्यावं की आम्ही तुम्हाला विसरणार नाही आणि माफही करणार नाही. हा हल्ला आम्ही कधीच विसरू शकत नाही. आम्ही हल्लेखोरांना शोधून काढू आणि या हल्ल्याचा लवकरच हिशोब चुकता केला जाईल, असा इशारा बायडन यांनी दिला आहे.

बायडन हे व्हाईट हाऊसमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान, पत्रकार परिषेदेच्या सुरूवातीला मौन बाळगून त्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली. तसेच अमेरिकेचा राष्ट्रध्वज हा एका दिवसासाठी अर्ध्यावर उतरवला आहे. हे हल्ले कोणी घडवून आणले आहेत, हे सर्व जगाला माहित आहे. पण अद्याप याबद्दल खात्री नाही, असं बायडन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या हल्ल्यांनंतरही अमेरिकेकडून होत असलेल्या मदतकार्यासह बचाव मोहीम सुरू राहील. आम्ही सर्व आमच्या देशातील नागरिकांची आणि आम्हाला मदत करणाऱ्या अफगाणिस्तानातील सहकाऱ्यांची सुखरूप सुटका करू, असं बायडन यांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या –  

अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेतील पोलिसाची बदली, संपत्ती ऐकाल तर डोळेच फिरतील!

पोलिसांनी कपडे फाटेस्तोवर मारलं, आता आदित्य ठाकरेंकडून मिळालं मोठं बक्षीस!

एकनाथ खडसेंना सर्वात मोठा धक्का, एवढ्या कोटी रुपयांची संपत्ती जप्त

“भाजप फुटीच्या उंबरठ्यावर, ‘हे’ नेते माझ्या संपर्कात”; काँग्रेस नेत्याच्या दाव्यानं खळबळ

‘या’ अधिकाऱ्यांच्या मुलांना मिळणार नोकरी!, राज्य सरकारची मोठी घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More