महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी केली मोठी घोषणा!

मुंबई | महाविकास आघाडीच्या प्रमुख तीन पक्षांची बैठक पार पडली आहे. या तिन्ही पक्षांनी एकजूट दाखवण्याचं ठरवलं आहे. हिवाळी अधिवेशनाआधी 17 डिसेंबर रोजी मुंबईत अतिभव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे.

बैठकीनंतर महाविकास आघाडीचा महामोर्चा 17 डिसेंबर रोजी मुंबईत काढण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा विराट महामोर्चा निघणार आहे. महाराष्ट्राचा अपमान सहन होत नाही त्यांनी येथे एकत्र यावं. महाराष्ट्र द्वेशांना धडा शिकवण्यासाठी एकत्र यावं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी सर्वांना केलं.

छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र फोडण्याचा डाव आखला जात आहे. सातत्याने महाराष्ट्राची अवहेलना केली जात आहे. फुटीरतेची बीजं इथं पेरली जात आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

दरम्यान, राज्यपालांना हटवण्याची मागणी महाविकासआघाडीने केली आहे. पण त्याआधी जरी राज्यपालांना हटवलं गेलं तरी मोर्चा हा निघणारच असं विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. बैठकीनंतर महाविकासआघाडीच्या नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली.

महत्त्वाच्या बातम्या-