बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इंग्लंड विरुद्ध सामन्यात विक्रमी खेळीनंतर वडिलांच्या आठवणीत भावुक झाला कृणाल पांड्या, पाहा व्हिडिओ

पुणे | भारत विरुद्ध इंग्लंड या पहिल्या ODI सामन्यात कृणाल पांड्याने उल्लेखनीय कामगिरी केली. जॉन माॅरिस यांनी 1990 साली केलेला विश्वविक्रम कृणाल पांड्याने कालच्या सामन्यात मोडून काढला. जॉन माॅरिस यांनी 35 बॉलमध्ये 50 रण काढून आपल्या नावे रेकॉर्ड बनवला होता. त्यानंतर पांड्याने आता 26 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण करून जॉन माॅरिस यांचा रेकॉर्ड मोडून काढला. त्यानंतर, कृणालला आपले अश्रू अनावर झाल्याने त्याचा लहान भाऊ हार्दिक पांड्या याच्या गळ्यात पडून तो रडू लागला. तसेच आपला नवा विक्रम त्याने वडिल हिमांशू पांड्या यांना समर्पित केला आहे.

कृणालच्या वडीलांचं जानेवारी महिन्यात निधन झालं. त्यामुळे त्यांच्या आठवणीत कृणाल भावुक झाल्याचं कळतंय. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून यासंबंधीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कृणाल पांड्या आपल्या लहान भावाला मिठी मारून रडत असल्याचं दिसून येत आहे.

जानेवारी महिन्यात सय्यद मुश्ताक अली स्पर्धा सुरु असतानाच वडिलांची निधनवार्ता कळाल्यामुळे कृणालला स्पर्धा सोडून परत जावं लागलं होतं. वडिलांची इच्छा होती की, आपल्या मुलांनी क्रिकेटमध्ये मोठं नावलौकिक मिळवावं त्यासाठी त्यांनी खूप मेहनतही घेतली आणि कधी कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाही. पण आता या दोघांची विजयी खेळी अनुभवण्यासाठी त्यांचे वडील या जगात नाहीत हे मोठं दुर्दैव.

कृणालने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना आजची इनिंग आपल्या वडिलांना समर्पित करत असल्याचं सांगितलं. त्यानंतर कृणाल वडिलांच्या आठवणीमध्ये पुन्हा एकदा भावुक झाला आणि त्याला शब्द सुचत नव्हते, त्यामुळे त्याने स्टार स्पोर्ट्सची माफी मागितली आणि तो तिथून निघून गेला.

 

पाहा व्हिडिओ –

थोडक्यात बातम्या – 

पहिल्याच ODI सामन्यात इंग्लंड संघाचा धुव्वा उडवत प्रसिद्ध कृष्णा आणि कृणाल पांड्याची धमाकेदार खेळी

“चित्रा वाघ आणि नवनीत राणांवर टीका करण्याआधी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षांनी आत्मपरीक्षण करावं” – तृप्ती देसाई

जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण

“आरक्षणासाठी अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा, मी पण त्यात सहभागी होईल” – नितीन राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More