शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट!
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राजीनाम्यानंतर शरद पवारांनी काल समिती नेमली, मात्र समितीत सुप्रिया सुळे यांच नावं नाही, मात्र सर्वार्थाने सुप्रिया सुळे यांच नावं पुढे येऊ शकतं अशी शक्यता अंकुश काकडे यांनी वर्तवली आहे. त्यामुळे हा एक मोठा गौप्यस्फोट मानला जात आहे.
अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली असून शरद पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली जात आहे. अंकुश काकडे यांनीही यावर भाष्य करत शरद पवार हेच अध्यक्ष राहावे अशी मागणी केलीये.
शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा मंगळवारी मुंबईत केली होती. त्यानंतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना हा निर्णय मागे घ्यावा यासाठी रेटा लावून धरला आहे.
एकूणच ही संपूर्ण परिस्थिती पाहता शरद पवार यांच्या कुटुंबात याबाबत काही चर्चा झाली आहे का? आधीच याबाबत ठरलं होतं. पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याबाबत काही चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
- “मुख्यमंत्री असताना फक्त दोनदा मंत्रालयात जाणे पचनी पडलं नाही”
- दिल्लीत मोदींसोबत झालेल्या ‘त्या’ भेटी मागचं कारण अखेर शरद पवारांनी सांगितलं
- शरद पवारांचा आत्मकथेतून अत्यंत खळबळजनक खुलासा!
- राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच महिला?; अजित पवारांचा पत्ता कट?
- सोलापूरचा सुपुत्र करणार देशातील द्राक्ष उत्पादकांचे नेतृत्व
Comments are closed.