बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आयपीएलच्या पुनरागमनानंतर राजस्थान राॅयलने शेअर केला भन्नाट व्हिडीओ; पाहा व्हिडीओ

मुंबई | 2021 च्या उर्वरित आयपीएलमधील सामने खेळवण्यात येणार की नाही?, याबाबत सर्वांच्या मनात साशंकता होती. मात्र बीसीसाआयने उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली. त्यानंतर खेळाडूंमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

आयपीएल पुन्हा चालू होणार असल्यानं आता खेळाडू आणि संघ मालकांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे. यातच आता सोशल मीडियावर ट्विटसाठी प्रसिद्ध असलेल्या राजस्थान राॅयल्सने एक मजेशीर व्हिडीओ ट्विट केला आहे. हा एडिट केेलेला व्हिडीओ आहे. ‘दिल दा मामला एक नंबर’ या गाण्यावर राजस्थान राॅयल्सचे खेळाडू डान्स करताना दिसत आहेत.

या गाण्यात कर्णधार संजू सॅमसंग, राहुल तेवतिया, जाॅस बटलर, जयदेव उनाटकट, ख्रिस माॅरिस यांच्यासह इतर खेळाडूंचे मुखवटे लावल्याचं या गाण्यात दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या आयपीएलकडे प्रत्येक क्रीडाप्रेमीचं लक्ष असतं. कोरोनामुळे आयपीएल होणार की नाही याबाबत मोठा प्रश्न होता मात्र बायोबबलमध्ये होणार असल्याने धोका नाही, यावर ठाम राहत बीसीसीआयने आयपीएल भारतातच खेळवण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, आयपीएसच्या आतापर्यंतच्या झालेल्या सामन्यात राजस्थान राॅयल्सने काही खास कामगिरी केलेली नाही. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यात केवळ 3 तीनवेळा विजय मिळवला आहे. या हंगामात सर्वात महागडा खेळाडू असलेल्या ख्रिस माॅरिसने आतापर्यंत 14 गडी बाद केले आहेत. राजस्थानचे खेळाडू फाॅममध्ये असल्यानं आता आगामी सामन्यात चांगली खेळी करतील अशी अपेक्षा आहे.

पाहा व्हि़डीओ-

 

थोडक्यात बातम्या-

“उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर सोनिया गांधी आणि शरद पवारांनी त्यांच्या हाताखाली काम करावं”

भाजपला धक्का! ‘इतक्या’ नगरसेवकांनी भाजपची साथ सोडत बांधलं शिवबंधन

‘मोदी सरकारला गुजराती कंपन्यांची काळजी’; मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला झापलं

10 सेकंद वाट पाहावी लागली तर आजपासून अजिबात टोल भरु नका!

2 कोटी रुपये जिंकण्याची संधी, ‘या’ सरकारी कंपनीची जबरदस्त ॲाफर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More