Top News देश

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या दगडफेकीनंतर जे. पी. नड्डांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

नवी दिल्ली | पश्चिम बंगालमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांच्या गाड्यावर दगडफेक झाली. गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. दरम्यान जे. पी. नड्डा यांनी या दगडफेकीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आज झालेल्या हल्ल्यात मुकूल रॉय आणि कैलाश विजयवर्गीय जखमी झाले आहेत. लोकशाहीसाठी ही लज्जास्पद घटना असल्याचं जे. पी. नड्डा यांनी म्हटलं आहे. भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

आमच्या ताफ्याती गाडीवर हल्ला झाला नाही अशी कोणती गाडी नाही. मी बुलेट पबुलेटप्रूफ कारमध्ये होतो म्हणून मी सुरतक्षित आहे. श्चिम बंगालमधील अराजकता आणि असहिष्णुता संपवावी लागेल. मी बैठकीला पोहोचलो असेल तर फक्त  देवी दुर्गाच्या आशीर्वादानेच, असं नड्डा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,  ममता बॅनर्जी सरकारच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचा आरोप यावेळी भाजप नेत्यांनी केला असून यासंबंधी गृहमंत्री अमित शहांना अहवाल मागितला आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या-

नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताला साक्ष ठरणारं असेल- नरेंद्र मोदी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत शिवसेनेने घेतला मोठा निर्णय!

देशातील ‘या’ नऊ राज्यांमध्ये ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेची अंमलबजावणी

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर दगडफेक

“पोरी उचलायची भाषा करणाऱ्या आमदाराला रक्तदानाचं महत्व काय समजणार?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या