शस्त्रक्रियेनंतर शरद पवार ठणठणीत, फोटो ट्विट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या…
मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास वाढल्यानं मंगळवारी रात्री त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी त्यांना मंगळवारी मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयात भरती करण्यात आलं होतं. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मंगळवारी रात्री शरद पवारांवर करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. त्यानंतर शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सकाळी शरद पवारांचा रूग्णालयातील फोटो शेअर केला आहे.
सुप्रभात, ब्रीच कँडी रूग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारिचका आणि स्पोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय शरद पवार त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्र वाचन करत आहेत, असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये शरद पवार वर्तमानपत्र वाचन करताना दिसत आहेत. त्यांच्या या ट्विटनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पहायला मिळत आहे.
पित्ताशयात असलेले खडे बाहेर काढण्यात आले आहेत. त्यांना सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर अमित मायदेव यांनी दिली आहे. त्यामुळे पुढील दहा दिवस शरद पवारांना रूग्णालयातच ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, मंगळवारी रात्री पवारांवर शस्त्रक्रिया करण्याआधी अजित पवार आणि सुप्रिया सुळे रूग्णालयात आले होते. तर पहाटे 4 वाजता राजेश टोपे यांनी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचं माध्यामांना सांगितलं. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या शस्त्रक्रियेनंतरचा पहिला फोटो शेअर केला आहे.
पाहा ट्विट-
सुप्रभात, ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय @PawarSpeaks साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत आहेत. pic.twitter.com/ERf0Gl35Tp
— Supriya Sule (@supriya_sule) March 31, 2021
थोडक्यात बातम्या-
राष्ट्रवादीविरोधात केलेली बंडखोरी भोवली, ‘या नेत्याची शिवसेनेतून हकालपट्टी
सिनेमात सेक्स दाखण्यापेक्षा पॉर्न फिल्मच बनवा- गोविंदा
पाणी जपून वापरा! ‘या’ कारणाने पिंपरी-चिंचवडकरांना दोन दिवस मिळणार नाही पाणी
जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता
शिवसेनेकडून नव्या प्रवक्त्यांच्या नावांची घोषणा, ‘या’ 16 जणांना मिळाली संधी
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.