बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुशांत प्रकरणानंतर पोलीस सावध, आता सिद्धार्थ प्रकरणात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | प्रसिद्ध अभिनेेता सिद्धार्थ शुक्लाचं अचानक निधन झाल्याने बॉलिवूड विश्वावर शोककळा पसरली आहे. शुक्लाचं 40 व्या वर्षीच जगाचा निरोप घेतला असून ह्रदयविकाराने निधन झालं आहे. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कुपर रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. यावेळी पोलिसांनी सावध पवित्रा घेत मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबई पोलिसांनी सिद्धार्थ शुक्लाच्या मृतदेह शवविच्छेदनाची व्हिडीओग्राफी करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी अभिनेता सुशांत सिंग प्रकरणातून धडा घेत कोणताही वाद किंवा शंका उपस्थित न होण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. सिद्धार्थच्या कुटुंबियांनी त्याच्या मृत्युबाबत कोणतीही शंका उपस्थित केली नाही. त्यासोबतच सिध्दार्थ कोणत्याही मानसिक तणावाखाली नसल्याची माहिती त्याच्या घरच्यांनी दिली.

हे जरी असलं तरी मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची खबरदारी घेण्यात येत आहे. सुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणामध्ये काहींनी मुंबईच्या पोलीस तपासावर काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावेळी सुशांत सिंग प्रकरण देशभर चर्चेत होतं. त्यातूनच धडा घेत या प्रकरणात पोलिसांनी शवविच्छेदनाची व्हिडीओग्राफी करण्याचा निर्णय घेतला आहे. सिध्दार्थच्या शवविच्छेदनाची कूपर रुग्णालयातील डॉक्टर्सची विशेष टीम तयार केली असल्याची माहिती समजत आहे.

दरम्यान, ओशिवारा पोलिसांकडे  या प्रकरणाची जबाबदारी असून पोलीस चौकशी करत आहेत. या अंतर्गत पंचनामा केला जाणार असून सिद्धार्थच्या जवळच्या व्यक्तींचे जबाब घेण्यात आले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

दिलासादायक! पुण्यात आज कोरोना बाधितांच्या रूग्णांमध्ये घट, वाचा आजची आकडेवारी

भारतातील ‘या’ ठिकाणांवर दहशतवाद्यांचा डोळा, गुप्तचेर यंत्रणेकडून हाय अलर्ट जारी

“सरकारमधील लोक तोंडात पान-गुटखा खाऊन बसलेत का?”

मृत्यूच्या 6 दिवस आधी सिद्धार्थनं केलं होतं मोठं काम, तुम्हालाही अभिमा वाटेल!

मृत्यूनंतर सिद्धार्थ शुक्लाच्या टीमची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More