बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच ममता बँनर्जी व राज्यपाल जगदीप धनखड यांच्यात वाक् युद्ध

कोलकाता | पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तुणमूल काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवलं. तुणमूल काँग्रेसने भाजपचा दारूण पराभव करत विजयाची हॅट्रिक साजरी केली. त्यानंतर बुधवारी ममता बँनर्जी यांनी तिसऱ्यांदा बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्री ममता बँनर्जी आणि बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांच्यात चांगलंच वाक् युद्ध रंगल्याचं पहायला मिळालं.

बंगालमध्ये होत असलेल्या हिंसेवर ममता बँनर्जी यांनी भाष्य केलं. बंगालच्या जनतेने शांत रहावं. सर्वच राजकीय पक्षाने शांतता बाळगावी, असं आवाहन ममता बँनर्जी यांनी केलं आहे. त्याचबरोबर राज्यातला कोरोना नियंत्रणात आणण्यास पहिलं प्रधान्य असल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या. यासंदर्भात बुधवारी दुपारी त्यांनी एक बैठक बोलावली आहे.

यावरून, सरकार कायद्याच्या आणि संविधानाच्या तत्वावर चालेल अशी आशा करतो. नवं सरकार राज्यासाठी काम करेल अशी आशा आहे. भारत हा लोकशाही देश आहे , येथे सर्व लोकशाही मार्गाने चालतं. बंगालमध्ये हिंसा भडकल्याचा रिपोर्ट माझ्याकडे आला आहे. बंगालमध्ये हिंसेवर माझी छोटी बहिण ममता बॅनर्जी तात्काळ निर्णय घेतील. त्या नव्या पद्धतीनं राज्य करतील अशी आशा आहे, असं राज्यपाल जगदीप धनखड म्हणाले.

यावर लगेच ममतांनी माईक हातात घेतला आणि प्रोटोकाॅल तोडून राज्यपालांना उत्तर दिलं. आजच मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. गेली 3 महिने राज्य हे निवडणूक आयोगाच्या हातात होतं. आयोगाने या काळात काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. आता मी सुत्र हातात घेतली आहेत, मी सर्वांना शांत राहण्याचं आवाहन करते, असं शाब्दिक उत्तर ममता बँनर्जी यांनी राज्यपालांना दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पोलिसांना माणुसकी आली अंगलट; रोजा सोडण्यासाठी आरोपीला सोडलं अन्…

“या महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाचा नियोजित पद्धतीने खून केला”

“मराठा आरक्षणाला राज्य सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत”

“पंतप्रधान कार्यालय निरुपयोगी, कोरोना लढ्याची जबाबदारी गडकरींकडे सोपवा”    

भारतीय संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाने आज गुणवंतांना न्याय दिला – ॲड. गुणरत्न सदावर्ते

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More