बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

न्यायालयाच्या ‘त्या’ निर्णयानंतर राज्यपालांनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट

नवी दिल्ली | विधानसभेत पाठवण्यात येणाऱ्या 12 आमदारांचा मुद्दा वर्षभरापासून चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधक या प्रकरणावरून आक्रमक झालेले दिसत आहे. 12 आमदारांच्या नियुक्त्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रखडवल्यानं राज्य सरकारने थेट न्यायालयाचे दरवाजे खटखटले होते. मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी मोठं भाष्य केलं होतं. त्यानंतर आता राज्यपाल कोश्यारी यांनी थेट दिल्ली गाठत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी रात्री गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. तातडीने त्यांनी दिल्लीत जाऊन अमित शहांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्याचं दिसतंय. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येतंय. अमित शहा यांनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपाल कोश्यारी याचं स्वागत केलं आणि या दोघांमध्ये विस्तृत चर्चा झाल्याचं देखील समोर येतंय.

12 आमदारांचा मुद्दा न्यायालयात गेल्यानंतर दोन न्यायमुर्तीच्या खंडपीठानं या प्रकरणाचा निर्णय दिला. राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नेमणूक करण्यास बराच उशिर झाला असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. राज्याच्या सुव्यवस्थेसाठी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात समन्वय असायला हवा असंही न्यायालयाने म्हटलं होतं. राज्यपाल कोणालीही उत्तर देण्यास बांधिल नाहीत. त्यामुळे उच्च न्यायालय त्यांना निर्देश देऊ शकत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे.

दरम्यान, जर मतभेद असतील तर राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढायला हवा. परिस्थितीचं भान ठेऊन या प्रकरणात लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेचं असल्याचं देखील न्यायालयानं म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

पत्नीची इच्छा नसतानाही शारीरिक संबंध प्रस्थापित करणं बेकायदेशीर नाही- मुंबई सेशन कोर्ट

कोरोनानंतर आता वाढतोय ‘हा’ आजार; शेतकऱ्यांना अधिक धोका

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आजची आकडेवारी

सैफचा जहांगीरसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अरं थांब गड्या नको घेऊ! …अन भारताने दुसराही डीआरएस गमावला तरीही विराट पंतवरच बिघडला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More