विजयानंतर मेस्सीने चाहत्यांना दिला मोठा धक्का!

नवी दिल्ली | अर्जेंटिना विरूद्ध फ्रान्स यांच्यात झालेल्या फुटबॉल (Football) वर्ल्डकप फायनलचा थरारा जगभरात सगळ्यांनी अनुभवला. शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीनं खेळल्या गेलेल्या या मॅचमध्ये अर्जेंटीनानं पेनल्टी शूट आऊटवर बाजी मारली आणि लिओनेल (Lionel Messi) मेस्सीचं स्वप्न पूर्ण झालं.

फायनलमध्ये धमाकेदार कामगिरी केलेल्या मेस्सीने नंतर सर्वांना मोठा धक्का दिला आहे. एकीकडे मेस्सीने वर्ल्डकप जिंकला तर दुसरीकडे त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली.

अर्जेंटिनाने जेव्हा अंतिम फेरीत प्रवेश केला होता तेव्हापासून अशी चर्चा सुरू झाली की, मेस्सीचा (Lionel Messi) हा अखेरचा वर्ल्डकप असेल आणि मॅच झाल्यानंतर तो निवृत्ती घेईल.

स्वत: मेस्सीने देखील तसे संकेत दिले होते. अशाच अंतिम फेरीत जेव्हा अर्जेंटिनाने विजय मिळवला तेव्हा तर सर्वांची खात्रीच झाली की मेस्सी आता निवृत्ती जाहीर करेल.

मेस्सीने एका मुलाखती दरम्यान बोलताना मी राष्ट्रीय संघातून निवृत्ती घेणार नाही. मला चॅम्पियन म्हणून खेळायचं आहे. मेस्सीच्या या वाक्यामुळे मेस्सीच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळालाय.

महत्त्वाच्या बातम्या-