बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लग्नानंतर नवरी स्वतःच गाडी चालवत पोहोचली सासरी; व्हिडीओ तुफान व्हायरल

कोलकाता | नवी नवरी फुलांनी सजवलेली गाडी चालवत आहे आणि नवरा तिच्या शेजारी बसला आहे, असं दृश्य पाहायला मिळालं, तर तुम्हालाही आश्चर्याचा धक्काच बसेल. कोलकात्यात मात्र, खरंच असं घडलं आहे. पारंपरिक भारतीय संस्कृतीमध्ये अगदी दुर्मीळ अशा या घटनेची नायिका आहे स्नेहा सिंघी. स्नेहाने इंन्स्टाग्रामवर आपल्या या आगळ्या वेगळ्या पाठवणीचा व्हिडीओ शेअर केला असून, सध्या सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा आहे.

स्नेहाचं नुकतंच सौगात उपाध्याय याच्याशी लग्न झालं. लग्नाचे विधी पार पडल्यानंतर नवरा-नवरी बिदाईची वेळ झाली. हा क्षण अतिशय हळवा असतो. मुलीला सासरी पाठवण्याच्या क्षणी आई-वडील मुलगी यांच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. सगळेच अगदी भावूक झालेले असतात. स्नेहा सिंघीच्या विवाह समारंभातही हे दृश्य बघायला मिळालं, पण या नंतर एक जबरदस्त ट्विस्टही बघायला मिळाला.

स्नेहा तिचा पती सौगात उपाध्याय याच्या गाडीत ड्रायव्हर सीटजवळील पॅसेंजर सीटवर बसली. पण काही क्षणातच ती तिथून उतरून चक्क ड्रायव्हर सीटवर बसली आणि सौगात तिच्या शेजारी बसला. मग स्नेहाने स्वतःच गाडी चालवत आपल्या सासरच्या घरी पोहोचली.

दरम्यान, एरवीही सौगातला गाडी फार चांगली चालवता येत नसल्यानं स्नेहाच गाडी चालवते. सौगातच्या ड्रायव्हिंगचा धसका घेतल्याचंही स्नेहाने मजेने सांगितलं. ते दोघे पहिल्यांदा डेटवर गेले तेव्हा देखील स्नेहानेच त्याला आपल्या गाडीतून त्याच्या घरी सोडलं होतं, अशी आठवणही तिनं सांगितली. तरीही लग्न झाल्यावर स्वतः गाडी चालवत सासरी जाण्याचा अनुभव रोमांचक असल्याची प्रतिक्रिया तिनं यावेळी व्यक्त केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sneha Singhi Upadhaya (@snehasinghi1)

थोडक्यात बातम्या –

पुण्यात कोरोना रुग्णांचा पुन्हा धक्कादायक आकडा, पाहा आजची आकडेवारी!

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी धडकी भरवणारी; मृत्युसंख्येत नवा विक्रम

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात संपुर्ण वाहतुक व्यवस्था 15 दिवस बंद

लेकीला सांभाळायला कोणीच नाही; म्हणून स्वतःसोबत बॉक्समध्ये घेऊन फिरतोय डिलिव्हरी बॉय, पाहा व्हिडीओ

धक्कादायक!!! बेरोजगारीला कंटाळुन पुण्यात इंजिनिअर तरूणाने उचललं हे टोकाचं पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More