बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लसीकरण झाल्यावर प्रत्येकाने 500 रूपयांची पंतप्रधान निधीत मदत करावी’; भाजपच्या या महिला मंत्र्यांचं आवाहन

नवी दिल्ली | कोरोना महामारीमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. कित्येकांचा वेळेवर ऑक्सिजन, बेड आणि उपचार न मिळाल्याने मृत्यु झाला. कोरोना संसर्गाला थोपवण्यासाठी केंद्र सरकारने लसीकरणावर भर देण्याचा निर्णय घेतला आणि 18 वर्षावरील सर्वांचं लसीकरण मोफत देण्याची घोषणा केली होती. मात्र अशातच मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनी लसीकरणाबाबत अजब वक्तव्य केलं आहे.

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे हात जोडून सर्वांना आवाहन करते की कोरोना विरोधी लसीकरण पूर्ण झालेल्यांनी पंतप्रधान मदत निधीत प्रत्येकी 500 रुपयांची मदत करावी, असं आवाहन उषा ठाकूर यांनी केलं आहे. इंदौरमध्ये त्या बोलत होत्या.

आपल्याला माहितच आहे की एका डोसची किंमत 250 रुपये आहे. जर आपल्याला सरकारकडून कोरोनाचे दोन्ही डोस मोफत मिळत असतील तर ज्यांना शक्य आहे त्यांनी 500 रुपये मदतनिधी म्हणून देण्यास काहीच हरकत नाही. ही माझी विनंती असल्याचं उषा ठाकूर म्हणाल्या.  याआधीही उषा ठाकूर यांना कोरोना महामारी घालवण्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, देशाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून दूर ठेवण्यासाठी आजूबाजूचं वातावरण शुद्ध करण्याची गरज आहे. त्यासाठी महायज्ञ करण्याची नितांत गरज असल्याचं उषा ठाकूर म्हणाल्या होत्या. मात्र आता पुन्हा एकदा कलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

“राष्ट्रवादीने दगड मारला कशावरून, कुणी जर स्वत:च गाडीवर दगड मारून घेत असेल तर काय बोलायचं?”

‘मी शिवसेनेत राहू नये असं अनेकांना वाटतं’; पक्षांतर्गत वाद पेटला!

सोन्याचा भाव आज पुन्हा वाढला, जाणून घ्या ताजे दर

पुण्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल, वाचा पुण्याची आजची आकडेवारी!

“आरक्षण संपुष्टात आणणं हा भाजप आणि संघाचा डाव”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More