मुंबई | क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सध्या विराट कोहली भारताचं कर्णधारपद सांभाळत आहे. विराट कोहलीनंतर भारतीय संघाच्या कर्णधारपदी युवा क्रिकेटपटू लोकेश राहुलची वर्णी लागू शकते, असं माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी म्हटलं आहे.
माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनींनतर भारतीय संघाच्या कर्णधापरदाची माळ विराट कोहलीच्या गळ्यात पडली होती मात्र आता कोहलीनंतर भारताचा कर्णधार कोण असा प्रश्न आकाश चोप्रा यांना विचारण्यात आला होता. त्याच्यावर उत्तर देताना आकाश चोप्रा यांनी लोकेश राहुलचं नाव घेतलं आहे.
लोकेश राहुलसुद्धा विराट कोहलीप्रमाणे आपल्या फिटनेसवर मेहनत घेतो. राहुल हा यष्टीरक्षकही आहे. लोकेश राहुल क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळू शकतो. त्याच्याकडे तेवढी क्षमता आहे. लोकेशने कसोटीच्या सामन्यात 199 धावा फटकावल्या होत्या. दुर्देवाने त्याचं एका धावेसाठी दुहेरी शतक हुकलं होतं. त्यासोबतच राहुलने वेस्ट इंडिजविरूद्ध टी-20 सामन्यात धडाकेबाज शतक ठोकलं होतं.
दरम्यान, राहुलच्या कर्णधारपदाखाली यंदा पंजाबचा संघ 2020 ची आयपीएल खेळणार आहे. त्यामुळे खरंच राहुलमध्ये कर्णधारपदाची गुणवत्ता आहे का हे दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
“बॉलिवूडच्या इतिहासात कंगणाएवढं धाडस कोणालाही जमलं नाही आणि भविष्यातही कोणी करु शकणार नाही”
दादा कुणाला म्हणायचं? या कारणावरुन दोन गटात गँगवॉर; 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
शुटिंग सुरु असताना कोसळला ‘हा’ अभिनेता; मदत न मिळाल्याने जागीच मृत्यू
त्या सर्वांची तोंडं काळी करून कंगणा गेली, आता मारा बोंबा- प्रताप सरनाईक
भाजपच्या मुख्यमंत्र्यावर टीका; पत्रकाराला घरात घुसून मारहाण