बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विरूष्काला मोठा धक्का! विराट कोहलीपाठोपाठ आता अनुष्कालाही डच्चू

मुंबई | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीभोवती सध्या अनेक वाद चालू आहेत. विराटला भारतीय मर्यादित संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आलं आहे. अशातच त्याची पत्नी आणि भारतीय सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्माला मोठा झटका बसला आहे. अनुष्का शर्मा गेल्या काही काळापासून चित्रपटजगतापासून लांब होती.

गत दोन वर्षांपासून अनुष्का आपल्या गरोदरपणामुळं आणि नंतर मुलीच्या संगोपणामुळं चित्रपटापासून लांब होती. परिणामी तिच्या हातातील चित्रपटामध्ये आता दुसरी अभिनेत्री काम मिळालं आहे. अनुष्का शर्मा भारतीय महिला संघाची महान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या बायोपिकमध्ये काम करणार होती. पण तिला या चित्रपटामधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

झुलन गोस्वामीच्या चकदा एक्सप्रेस या बायोपिकमध्ये अनुष्का आघाडीचा रोल करणार होती. पण आता तिच्या जागी तृप्ती डिमरी ही अभिेनेत्री मुख्य भुमिकेत असणार आहे. अनुष्का या चित्रपटामध्ये सहनिर्मात्याच्या भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाचं शुटींग लवकरच सुरू होणार आहे. केवळ नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच विराट कोहलीला भारतीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आलं आहे. अशातच आता अनुष्काला डच्चू मिळाल्यानं या जोडीची सध्या सर्वत्र चर्चा होतं आहे.

थोडक्यात बातम्या

देशभर गाजलेल्या शीना बोरा प्रकरणात मोठा ट्विस्ट; इंद्राणी मुखर्जीनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?

बीसीसीआयशी पंगा घेणाऱ्या विराटला कपिल देव यांचा मोलाचा सल्ला, म्हणाले…

‘हे लोकशाहीत चालतं का?’, अजित पवारांनी राज्यपालांना सुनावलं

…अन् यशपाल शर्माने मद्रासचा राग मँचेस्टरमध्ये काढला, पाहा व्हिडीओ

आता श्रेयवादाची लढाई सुरू?, शिवाजीराव आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंना टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More