बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विराटनंतर आता ‘हा’ भारतीय खेळाडूही सोडणार आयपीएलचं कर्णधारपद?

मुंबई | सध्या आयपीएल शेवटच्या दोन सामन्यांवर येऊन ठेपली आहे. आता या चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. आयपीएल 2021 चा शेवट होत नाही तोच आयपीएल प्रेमींना 2022च्या आयपीएलची चाहून लागल्याचं पहायला मिळत आहे.

विराट कोहलीनं आयपीएलचं कर्णधारपद सोडलं असताना आता आणखी एक खेळाडू कर्णधारपद सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून पंजाब किंग्सचा कर्णधार के. एल. राहुल आहे. राहुल पुढच्या हंगामात पंजाब संघाची साथ सोडणार असल्याचं समोर येत आहे.

क्रिकबझनं दिलेल्या वृत्तानुसार राहुल पंजाबसोबतची 4 वर्षांची साथ आता सोडणार आहे. काही आयपीएल टीमनी 2022 सालच्या लिलावात राहुलला कॅप्टन करण्यात रस दाखवला आहे. तसंच तो 11 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीला विकला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विराटनं कर्णधारपद सोडणार आहे त्यामुळे आता राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुही राहुलला कर्णधार करण्यासाठी रस दाखवत असल्याचं समजत आहे. त्यामुळे आता राहुल काय निर्णय घेईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

कोरोना नियमांचं पालन न केल्यास भरावा लागणार ‘इतक्या’ हजारांचा दंड

इंधन दरवाढीवर आज पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

बिग बॉसच्या दोन भागांसाठी मांजरेकरांना मिळतात इतके लाख; मानधन ऐकून व्हाल थक्क

केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं इंधन दरवाढीचं कारण, म्हणाले…

SBI ने शेतकऱ्यांसाठी आणली नवी योजना; होणार ‘हा’ मोठा फायदा, वाचा सविस्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More