बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विराटनंतर टीम इंडियाचा कर्णधार कोण? ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सराव सामन्यात मिळाले संकेत

मुंबई | भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर कर्णधारपदाचा राजीनामा देणार आहे. अलिकडेच इंग्लंड संघाला 7 गडी राखून धूळ चारल्यानंतर भारताचा ऑस्ट्रेलिया संघासोबत सराव सामना सुरू आहे. त्यामुळे विराटनंतर टी -20 संघाचा कर्णधार कोण? याकडे सगळ्याचं लक्ष लागून होतं. मात्र आजच्या सराव सामान्यातून कर्णधारपद कोणाला मिळणार याचे संकेत मिळाले आहेत.

विश्वचषकासाठी भारताने पूर्ण तयारी केल्याचं मागील सामन्यातून दिसून आलं. सलामीवीरांनी केलेल्या दमदार कामगीरीमुळे भारताने सराव सामन्यात इंग्लडवर सहज विजय मिळवला. त्यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहलीला फक्त 13 चेंडूत 11 धावा काढता आल्या. ऑस्ट्रेलियासोबत होत असलेल्या सराव सामन्यासाठी सलामीवीर फलंदाज रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे असं दिसून येत आहे की, विश्वचषक सामन्यानंतर विराट नंतर आता रोहित शर्माकडेच कर्णधारपदाची जबाबदारी जाणार असल्याचं समोर येतंय.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली या सामन्यात विराट कोहलीने गोलंदाजी देखील केली. त्यावेळी कोहलीने 2 षटक टाकत 12 धावा दिल्या. विराट कोहली हा पार्ट टाईम गोलंदाज आहे. त्यामुळे हार्दिक पांड्या जर गोलंदाजी करू शकला नाही, तर त्या जागी विराट गोलंदाजी करू शकतो, असं काही खेळाडूंनी म्हटलं आहे. तत्वपूर्वी सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने 152 धावांच लक्ष्य भारताला दिलं आहे.

दरम्यान, सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथने सार्वधिक 57 धावांची खेळी साकारली. त्यानंतर मॅक्सवेलने 37 आणि मार्क स्टाईनिसने केलेल्या जलद 41 धावांमुळे ऑस्ट्रेलियाला भारतासमोर 152 धावांचं लक्ष्य ठेवता आलं. अश्विनने घातक गोलंदाजी करत 2 खेळाडूंना तंबूत धाडलं. अखेर हाती आलेल्या वृत्तानूसार सुर्यकुमार 7 आणि रोहित शर्मा 32 धावांवर खेळत आहे.

थोडक्यात बातम्या- 

“मी शरद पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता, मेलो तरी त्यांना सोडणार नाही”

‘शशिकांत शिंदेंना भाजप 100 कोटींची ऑफर देईल असं मला वाटत नाही’; प्रविण दरेकरांचं शिंदेंना प्रत्युत्तर

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; विविध विषयांवर अर्धा तास चर्चा

‘आम्ही रात्री 1 वाजेपर्यंत वाट पाहिली, तुमचं हे काय चाललंय?’; न्यायालयाने योगी सरकारला फटकारलं

“निवडणुकीत तुम्ही भाजपला आघाडी द्या, मी तुम्हाला गाव जेवण देतो”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More