महादेव मुंडे खून प्रकरण; वाल्मिक कराडनंतर आता मुलगाही येणार गोत्यात?

Walmik Karad

Mahadev Munde Murder Case | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर (Santosh Deshmukh Murder Case) राज्याचे राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. खंडणी ते हत्या प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप असणारा वाल्मिक कराड (Walmik Karad) 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) आहे.  त्यातच सध्या आणखी एका प्रकरणाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. परळीत भर तहसील कार्यालयासमोर झालेल्या महादेव मुंडे खून प्रकरणात (Mahadev Munde Murder Case) पंधरा महिने उलटूनही आरोपी फरारच आहेत.

महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलाचे नाव घेतले जात आहे. दरम्यान वाल्मिक कराड नंतर आता त्याचा मुलगाही गोत्यात येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाला आमदार सुरेश धस (MLA Suresh Dhas) यांनी पुन्हा एकदा वाचा फोडल्यानंतर बीडमधील (Beed) घडामोडींना वेग आला आहे. महादेव मुंडे यांचे कुटुंबीय आज पोलिस उपाधीक्षकांची भेट घेणार असल्याची माहिती असून सकाळी 11 वाजता मुंडे कुटुंबीय अंबाजोगाई (Ambajogai) येथील कार्यालयात जाणार आहेत.

आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर वेग आला आहे. महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांची ही भेट महत्त्वाची ठरणार आहे. या भेटीनंतर तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे.

तपास पोलिस उपअधीक्षकांकडे वर्ग

दरम्यान बीड पोलिस अधीक्षकांच्या (Beed Superintendent of Police) निर्णयानंतर महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास परळी पोलिस ठाण्यातून (Parli Police Station) काढून घेतला असून बीड पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत (Navneet Kawat) यांनी पोलिस उपअधीक्षक अनिल चोरमले (Anil Chormale) यांच्याकडे वर्ग केला आहे. तपास उपअधीक्षकांकडे या प्रकरणाचा तपास वर्ग झाल्यानंतर आज महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांची ही भेट महत्त्वाची ठरणार आहे. आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून (Local Crime Branch) व्हावा अशी मागणी केली होती.

पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. तपासात कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे आश्वासन पोलिस अधीक्षकांनी दिले आहे. (Mahadev Munde Murder Case)

महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपशील

परळीमध्ये (Parli) भोपळा येथील मूळ रहिवासी असलेले महादेव मुंडे या व्यवसायिकाचा धारदार शस्त्राने खून (Murder) करण्यात आला होता. 22 ऑक्टोबर 2023 रोजी तहसील कार्यालयाच्या (Tehsil Office) समोरील प्रांगणात महादेव मुंडे यांचा मृतदेह आढळला. या घटनेला 14 महिने उलटून गेले तरी आरोपी फरार असून खून प्रकरणाचा तपासही झाला नसल्याचे आमदार सुरेश धस यांनी समोर आणले होते. या हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे (LCB) देण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी केली होती. मात्र परळीचे व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास अंबाजोगाई पोलिस उपअधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडे सोपवण्याचे आदेश काढण्यात आले.

आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणाचा तपास वेगाने करण्याची मागणी केली आहे. 14 महिने उलटूनही आरोपींना अटक न झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वाल्मिक कराडच्या मुलावर गंभीर आरोप

या खून प्रकरणात मुंबईतील सायबर तज्ञांनी (Cyber Experts) 150 मोबाईल काढले. मात्र बीड पोलिसांनी या मोबाईलची साधी चौकशीही केली नाही असा आरोप धस यांनी केला होता. या खून प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलाचे नाव घेतले जात आहे. खून झाला त्या घटनास्थळावरून वाल्मिक कराडचा मुलगा सुनील कराडने (Sunil Karad) मोबाईलवर फोन केल्याचा देखील आरोप करण्यात आला होता. या सगळ्या आरोपानंतर बीडमध्ये घडामोडींना वेग आला आहे. महादेव मुंडे यांचे कुटुंबीय या प्रकरणाच्या तपासाबाबत पोलिस अधीक्षकांची भेट घेणार आहेत. (Mahadev Munde Murder Case)

Title: After  Walmik Karad Now His Son Under Scanner in Mahadev Munde Murder Case

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .