इम्रान ताहिरचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही पण म्हणाल, ‘खेळभावना असावी तर अशी’, पाहा व्हिडिओ
मुंबई | पाकिस्तान सुपर लीगच्या 14 व्या सामन्यात मुल्तान सुल्तानकडून खेळणार्या दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहिरने क्वेटा ग्लेडिएटर्सविरूद्धच्या सामन्यादरम्यान एक अशी कृती केली ज्या कृतीची संपूर्ण क्रिकेट विश्वात चर्चा होत आहे. पाकिस्तानमधल्या क्रिकेट स्पर्धेत खेळताना दक्षिण आफ्रिकेच्या इम्रान ताहिरने पाकिस्तानी दिवंगत खेळाडू ताहिर मुगल यांना आपल्या पद्धतीने आदरांजली वाहिली. त्यामुळे त्याच्या खेळभावनेचं चौफेर कौतुक होत आहे.
इम्रान ताहिरचा हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर चाहते खूपच भावूक झाले आहेत. ताहिरने ग्लेडिएटर्स संघाचा फलंदाज सॅम अयूबला बाद करताच त्याचा आनंद साजरा करण्यासाठी आपल्या अंगावरील टी-शर्ट काढला. जेव्हा इम्रानने आपला टी-शर्ट अंगावरुन काढला त्यावर पाकिस्तानचा माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू ताहिर मुगल यांचा फोटो होता. याच कृतीने त्याने क्रिकेट रसिकांचे मने जिंकली.
क्वेटा ग्लेडीएटर्स विरुद्धच्या सामन्यात इम्रान ताहिरने 4 षटकांत 29 धावा देऊन 2 बळी घेतले. प्रथम फलंदाजी करताना क्वेटाच्या संघाने 20 षटकांत 7 गडी गमावून 176 धावा केल्या. त्यामध्ये उस्मान खानने 81 धावा केल्या. उस्मान खानने केवळ 50 चेंडूत 81 धावा करून संघाची धावसंख्या 176 धावांवर नेण्यात विशेष भूमिका बजावली. शहनावाज धानीने मुलतानकडून सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.
दरम्यान, पाकिस्तानचा माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू ताहिर मुगल यांचे कर्करोगाने निधन झाले होते. ताहिर मुगल यांनी पाकिस्तानकडून 112 श्रेणी सामने खेळले होते. त्यात त्यांनी 3 हजार 202 धावा केल्या होत्या. क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर ताहिर मुगलने बराच काळ प्रशिक्षक म्हणून काम केले. मात्र, वयाच्या 43 व्या वर्षी कर्करोगाच्या आजारामुळे त्यांचे निधन झाले. 10 जानेवारीला ताहिर मुगल यांचे निधन झाले होते.
A touching tribute by @ImranTahirSA for Tahir Mughal, the Pakistani ex-cricketer who passed away earlier this year. #HBLPSL6 | #MatchDikhao | #QGvMS pic.twitter.com/TCqoWLT5BO
— PakistanSuperLeague (@thePSLt20) March 3, 2021
थोडक्यात बातम्या –
अजित पवारांविरोधात सुधीर मुनगंटीवारांचा हक्कभंग प्रस्ताव!
‘त्या’ महिलेने स्वत: अंगातील झगा काढला; अनिल देशमुखांनी सांगितलं जळगाव वसतीगृहात नेमकं काय घडलं!
अजित पवारांविरोधात सुधीर मुनगंटीवारांचा हक्कभंग प्रस्ताव!
देवेंद्र फडणवीसांनंतर आता योगी आदित्यनाथ यांनीही दिला ‘मी पुन्हा येईन’चा नारा
Renault Kiger गाडीचा बाजारात धुमाकूळ; पहिल्याच दिवशी झाली विक्रमी विक्री
Comments are closed.