Top News खेळ

ऑस्ट्रेलियन चाहत्यांकडून पुन्हा वर्णद्वेषी टीका, खेळ थांबवण्याची आली वेळ, पहा व्हिडीयो

सिडनी | भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तिसरा कसोटी सामना चालू आहे. दरम्यान काल म्हणजेच तिसऱ्या दिवशी भारताचे गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि गोलंदाज मोहम्मद सिराज यांना वर्णद्वेषी टीका केली होती. ऑस्ट्रेलियान फॅन्सकडून पुन्हा चौथ्या दिवशीही अशी टीका केल्याचं दिसून आलं.

चौथ्या दिवशी सिडनीच्या मैदानात सामना पाहण्यासाठी आलेल्या काही चाहत्यांनी त्याच प्रकाराची पुनरावृत्ती केली. त्यामुळे आजच्या दिवशी सुरू असलेला खेळ थांबवण्याची वेळ आली होती.

मोहम्मद सिराज क्षेत्ररक्षण करत असताना काही चाहत्यांनी त्याच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्याने प्रथम दुर्लक्ष केलं, मात्र त्यांच्याकडून वर्णद्वेषी टीका थांबत नसल्याने त्याने थेट कर्णधार अजिंक्य रहाणेला याबाबत सांगितलं. रहाणेने देखील तातडीने ही गोष्ट अंपायच्या कानावर घातली.

यामध्ये काही काळ खेळ थांबवण्यात आला होता. या घडलेल्या प्रकारामध्ये अजिंक्य रहाणे तसंच टीम इंडिया सिराजच्या पाठीशी असल्याने सर्वांनी कौतुक केलंय.

थोडक्यात बातम्या-

एका बायकोवरुन दोन जणांच्या गटात तुफान हाणामारी; सहा जणांना अटक

भंडाऱ्यातील घटनेने पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तरही हळहळला; म्हणाला…

आग विझवताना गॅस सिलेंडरचा स्फोट; अग्निशमन दलाचे 3 जवान जखमी

आई-वडील शेतकरी असल्यानं त्यांचं दुःख जवळून पाहिलं; लग्नानिमित्त घेतला स्तुत्य निर्णय

सेक्स पोजिशन ट्राय करण्याच्या नादात तरुणाचा मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या