मुंबई- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ठाकरे यांना टक्कर देण्यासाठी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीकडून गौतम गायकवाड यांना उमेदवार देण्यात आली आहे.
गौतम गायकवाड हे माजी पोलीस अधिकारी आहेत. त्यामुळे एका पोलीस अधिकाऱ्याला उमेदवारी देऊन वंचित बहुजन आघाडीने आदित्य ठाकरेंसमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
आदित्य ठाकरे हे ठाकरे घराण्यातील पहिलेच उमेदवार आहेत जे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे वरळीतील लढतीला महत्व प्राप्त झाले असून येथील निकालाकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून वरळीतून कोण उमेदवार असणार याची प्रतीक्षा आहे. शिवाय मनसेनेही अजून उमेदवार जाहीर केलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
मेधा कुलकर्णी म्हणतात, मला खंजीर खुपसून प्राण घेतला तरी चालेल पण…. https://t.co/BlBpX0ev5T @Medha_kulkarni @ChDadaPatil @BJP4Maharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) October 2, 2019
दुसऱ्या यादीत तरी नाथाभाऊंचं नाव असावं अशी माझी मनापासून इच्छा- पंकजा मुंडे https://t.co/7lCBmC9b5r @BJP4India
— थोडक्यात (@thodkyaat) October 2, 2019
अमित देशमुखांना धक्का, भाजप मोठा डाव टाकून लातुर काँग्रेसमध्ये भुकंप करणार? https://t.co/zYDDBWayen @AmitV_Deshmukh @INCMaharashtra @BJP4Maharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) October 2, 2019
Comments are closed.