बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर अवघ्या दिड महिन्यातच महाराष्ट्रातील ‘या’ शहराचा रक्तसाठा तिपटीने वाढला

पुणे | महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असतानाच महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. काही दिवसांपूर्वी पुण्यातही रक्ताचा साठा अपुरा असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं.

पुण्यातील विविध सामाजिक संस्था तसेच रक्तपेढी यांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून पुण्यातील रक्ताचा साठा वाढवण्यास मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. या रक्तदान शिबिराला पुण्यातील नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुण्यातील रक्तसाठा आता जवळपास तिप्पट वाढला असल्याचं स्पष्ट झालं आहे.

पुणे शहरामध्ये गेल्या दीड महिन्यात तब्बल 10 हजार 528 रक्ताच्या पिशव्यांचं संकलन करण्यात आलं आहे. तसेच एप्रिल आणि मे महिन्यात सामाजिक संस्थांनी मोठ्या प्रमाणात शिबिर आयोजित करून लोकांनाही रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं. त्याला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्ताचा साठा वाढवण्यास मदत केली आहे.

सध्या पुणे शहरामधून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये रक्ताचा पुरवठा करण्यात येत आहे. रक्ताचा साठा काही दिवसांपूर्वी कमी पडला असतानाच चिंतेचं वातावरण पसरलं होतं. पण आता रक्तसाठ्यात तीन पटीने वाढ झाल्याने समाधानकारक वातावरण पाहायला मिळत आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन रक्ताचा साठा वाढवण्यात हातभार लावल्याबद्दल पुण्यातील नागरिकांचं सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या –

‘…तर भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देईल- संभाजीराजे भोसले

कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या ‘या’ शहरातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 500च्या खाली

“मोदी सरकारने भारतीयांना पीएम केअर्स फंडाचा हिशोब द्यावा”

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक संसर्गाचा धोका नाही; एम्सचे संचालक म्हणतात…

 पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचे भररस्त्यात फाडले कपडे आणि नंतर घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More