बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सकारात्मक बातमी: वय 88, HRCT स्कोअर 25, त्यात मधुमेह; तरीही कोरोनावर मात!

नाशिक | रोगप्रतिकारकशक्तीच्या जोरावर कोणताही रोग बरा होऊ शकतो. असाच काहीसा प्रत्यय नाशिक येथील 88 वर्षीय चांगदेवराव होळकर यांना आला आहे. कोरोनाच्या संकटाशी संपूर्ण देश सध्या लढत आहे. बऱ्याच ठिकाणी आरोग्य यंत्रणा अपुरी पडून ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचीही उपलब्धता नसल्याने रुग्णांना आपला प्राण गमवावा लागत आहे. त्यातच नाशिकमधून एक दिलासादायक आणि सकारात्मक बातमी समोर आली आहे.

नाशिकच्या लासलगाव येथील नाफेडचे माजी अध्यक्ष चांगदेवराव होळकर यांनी आपल्या रोगप्रतिकारकशक्तीच्या जोरावर वयाच्या 88 व्या वर्षी कोरोनावर मात करून एक नवा आदर्शच लोकांसमोर ठेवला आहे. घरात काम करणाऱ्या कामगाराचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर चांगदेवराव आणि त्यांच्या पत्नीने कोरोना चाचणी करून घेतली. त्यानंतर चांगदेवराव होळकर यांच्या पत्नीचा अहवाल निगेटिव्ह आला आणि त्यांचा स्वतःचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पण त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती.

चांगदेवराव यांची एचआरसिटी टेस्ट करण्यात आली पण सुरुवातीला त्यांचा स्कोअर त्याच्यामध्ये 7 आला पण त्यांचं वय जास्त असल्याने आणि त्यांना मधुमेहाचा त्रास असल्याने डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्यास सांगितलं. उपचार सुरू झाल्यानंतर दहाव्या दिवशी त्यांची परत एकदा  एचआरसिटी चाचणी करण्यात आली त्यामध्ये त्यांचा स्कोअर 25 पैकी 25 आढळून आला आणि तरीही त्यांना कोणताही त्रास जाणवत नव्हता हे आश्चर्यकारक.

चांगदेवराव होळकर यांना ना आयसीयूची गरज पडली ना व्हेंटीलेटरची… हे पाहून डॉक्टर देखील चकित झाले. डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरची गरज पडू शकते याची कल्पना कुटुंबीयांना दिली पण चांगदेवराव होळकर यांनी पुढचा उपचार घरीच घेण्याचा निर्णय घेतला आणि ते घरीच विलगीकरणात राहिले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली आणि अखेर ते कोरोनामुक्त झाले. फक्त रोगप्रतिकारकशक्तीच्या जोरावर चांगदेवराव यांनी वयाच्या 88 व्या वर्षी कोरोनावर मात केली.

थोडक्यात बातम्या

आई आणि मुलाचा कोरोनाने मृत्यू, बाप अत्यवस्थ; पत्नी आणि मुलगीही पॅाझिटिव्ह

लस घेतल्याचं प्रमाणपत्र दाखवा अन्यथा 500 रूपये दंड भरा; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात नवा नियम लागू

पुण्यातून राज्य चालवा नाहीतर पुण्याला नवा पालकमंत्री द्या- चंद्रकांत पाटील

“पवारसाहेब, तुम्ही काही करु नका, तुमचे कारखाने हवेतला ऑक्सिजनही सोडणार नाहीत”

सोशल मीडियावरही रुजतेय वाचनसंस्कृती, ‘वाचनवेडा’ फेसबुक ग्रुप करतोय कमाल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More