बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘वय वाढलं पण त्यांची बुद्धी…’; उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंवर हल्लाबोल

सातारा | काही दिवसांपूर्वी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने जरंडेश्वर साखर कारखान्याला दिलेल्या कर्जवाटप प्रकरणी बँकेला ईडीने नोटीस बजावली होती. याप्रकरणावरुन आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale)आणि खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्यात शाब्दिक चकमक पहायला मिळाली. अशातच आता उदयराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

आम्ही नारळ वाढवून चांगली कामं करतो मात्र तुम्ही लोकांची घरं फोडता. काही काम झालं की आम्ही केल म्हटलं जाते. वय वाढलं पण यांची बुद्दी लहान मुलांपेक्षा कमी होत चालली आहे, असा टोला उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे भोसले यांना लगावला आहे.

उदयनराजे यांनी पुढे म्हटलं की, इतक्या वैयक्तिक पातळीवर जाणं मला पटत नाही. पण दिशाहीन झालेले अत्यंत संकुचित वृत्ती असणारे काही लोक असतात. त्यांच्याकडून फार अपेक्षा करणं अन्याय करण्यासारखं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर टीका करताना साताऱ्यात नारळफोड्या गँग फिरत आहे असा टोला लगावला होता. आता यावरुनच आरोप-प्रत्यारोपांची खेळी पहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

“गुलाबराव पाटील हा तर रांझ्याचा पाटील, त्यांची मंत्रीपदावरून कधी हकालपट्टी करणार?”

“सगळे रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे नसतील तर राजीनामा देईल”

“महाविकास आघाडी सरकार हरवलंय, शोधून देणाऱ्यास…”

“महाविकास आघाडी करताना काॅंग्रेसला फसवलं जाईल, हे मी स्पष्ट सांगितलं होतं”

“मी हरलो तर राजकारण सोडेन”, नवज्योतसिंह सिद्धूंचं खुलं आव्हान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More