बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणून मुलींच्या लग्नाचं वय 18 वरून 21 वर्ष केलं’; मोदींनी सांगितलं कारण

नवी दिल्ली | गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकार (Central Government) मुलींच्या विवाहाचं वय वाढवणार अशा चर्चा सुरू होत्या. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लाल किल्ल्यावरील भाषणात याविषयीचे संकेत दिले होते. त्यानंतर आता कॅबिनेटच्या मंजुरीनंतर आता लोकसभेत विधेयक मांडलं होतं. मात्र, सरकारनं पुर्वसुचना न देता हे विधेयक मांडल्यामुळे संसदेत गदारोळ झाल्याचं पहायला मिळालं. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामागील कारण सांगितलं आहे.

प्रयागराजमध्ये बोलताना नरेंद्र मोदींनी मुलींच्या लग्नाचं वय 18 वरून 21 वर्ष करण्यामागील कारण सांगितलं आहे. आपल्याला शिक्षणासाठी आणि प्रगतीसाठी वेळ मिळावा, त्यांना देखील बरोबरीची संधी मिळावी, अशी मुलींची इच्छा आहे म्हणूनच हा निर्णय घेण्याचा प्रयत्न आहे. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

देशातील मुलींच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, याचा कोणाला त्रास होतोय हे आपण पाहत आहोत, असं म्हणत त्यांन विरोधकांना टोला लगावला आहे. डबल इंजिन सरकारने जो सन्मान महिलांना दिला आहे. जी सुरक्षितता दिली आहे, हे अभुतपूर्व आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच आता भाजपचे दिग्गज नेते युपी विधानसभेसाठी तयारीला लागले आहेत. अशातच पंतप्रधान मोदींचा हा दौरा भाजपसाठी महत्त्वाचा आहे.

थोडक्यात बातम्या-

सावधान! गुगलवर ‘या’ 5 गोष्टी शोधाल तर थेट जेलमध्ये जाल

पोस्टाची भन्नाट योजना! लहान मुलांचं खातं उघडल्यावर मिळणार दरमहा 2500 रुपये

“इथं कोणी ‘शहेनशहा’ टिकला नाही तर बाकी ‘शहांची’ काय गोष्ट”

उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू; ‘या’ 10 मुद्द्यावरून अधिवशेन गाजणार?

“170 आमदारांच्या पाठिंब्याचा दावा पोकळ, ठाकरे सरकार कधीही अडचणीत येऊ शकतं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More