देश

देशात मुलींच्या विवाहाची वयोमर्यादा बदलणार; पंतप्रधान मोदींकडून संकेत

नवी दिल्ली | 74 व्या स्वातंत्र्यदिना निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन भाषण केले. त्यावेळी त्यांनी मुलींच्या लग्नाचे वय बदलणार असल्याचे संकेत दिले आहेत.

देशात 40 कोटी जनधन खाती सुरु झाली आहेत त्यापैकी 22 कोटी खाती ही महिलांची आहेत. भारतीय महिलांना जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे, तेव्हा तेव्हा त्यांनी त्या संधीचं सोनं केलं आहे. नोकरदार महिलांसाठी साहा महिन्याची भरपगारी सुट्टी देण्यात आली आहे. तिहेरी तलाकमुळे महिला त्रस्त होत्या, त्यांनाही स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. तसेच गरीब मुलींच्या आरोग्याचीही सरकारला चिंता असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

लाल किल्ल्यावरुन नॅशनल डिजीटल हेल्थ मिशनची घोषणा केली. या योजनेद्वारे प्रत्येक नागरिकाचे हेल्थ कार्ड बनवलं जाणार आहे. त्या कार्डव्दारे त्याच्यावर डॉक्टरांनी कोणते उपचार केले, कोणती औषधे दिली, त्याला असलेले आजार, त्यावर कोणती निदाने केली आहेत, इत्यादी माहिती ठेवली जाणार आहे. ही योजना मध्यमवर्गीयांसाठी फायद्याची असल्याचं मोदींनी सांगितलं.

दरम्यान, कोरोना वरील औषध कधी येणार, ते देशातील नागरिकांपर्यंत कधी पोहचणार या आदी बाबींवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

“देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्ष गृहखातं सांभाळूनही….”; मुश्रीफांचा फडणवीसांना सणसणीत टोला

दिवंगत अभिनेता सुशांतला कॅलिफोर्नियाकडून मरणोत्तर पुरस्कार

स्वातंत्र्यदिनानिमित्त गुगलने बनवलंय हे एक खास डुडल

“आपके राज्य में बिना आपके परमिशन आ गये”

“शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं करणार” स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्याचा निर्धार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या