बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आक्रमक हार्दिक पांड्याला भारतीय संघातून डच्चू, समोर आलं ‘हे’ कारण

मुंबई | भारत आणि न्युझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील अंतिम सामना इंग्लंडमध्ये खेळला जाणार आहे. त्याआधी बीसीसीआयने भारतीय संघासाठी इंग्लंड दौरा देखील आयोजित केला आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना इंग्लंडच्या खेळपट्टीची ओळख होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. पण यात भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा आक्रमक आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याला संघातून डच्चू देण्यात आला आहे.

निवड समितीचे माजी सदस्य सरनदीप सिंग यांनी हार्दिकला डच्चू देण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. खेळाडू जर ऑलराऊंडर म्हणून संघात खेळत असेल आणि तो बॉलिंग टाकत नसेल, तर त्याला केवळ बॅटिंगच्या आधारावर संघात कशी जागा द्यायची?, असा सवाल सरनदीप सिंग यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर त्यांनी हार्दिकला संघातून वगळण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

संघातून का वगळलं याची बीसीसीआयकडे ठोस कारणं आहेत. हार्दिक शस्त्रक्रियेनंतर गोलंदाजी शकत नाही. गेले अनेक दिवस त्याने बॉलिंग केलेली नाही. मला वाटतं जर कुणालाही संघात अष्टपैलू म्हणून खेळायचं असेल तर त्याने बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही विभागात योगदान द्यायला हवं, असं सरनदीप सिंग म्हणाले.

दरम्यान, कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वात इंग्लंडसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल, वृद्धिमान साहा या खेळाडूंना संघात स्थान दिलं गेलं आहे.

थोडक्यात बातम्या-

करुणा मुंडेंच्या पुस्तकावरुन वादाला सुरुवात, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल

गुजरात सरकार आकडे लपवतंय?, 71 दिवसात बनले 1 लाख 23 हजार मृत्यू प्रमाणपत्र

केवळ 17 मिनटात पार पडला विवाह सोहळा; नवरदेवानं हुंड्याऐवजी मागितलं ‘हे’ अनोखं गिफ्ट

धोका वाढला! अहमदनगरमध्ये Mucormycosis मुळे इतक्या जणांचा मृत्यू

‘राजा कायम पण…’; पाहा काय म्हटलंय भेंडवळच्या भविष्यवाणीत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More