बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पोलिसांचा आक्रमक पवित्रा; नियम न पाळल्यास दांडुक्याचा होणार वापर

नाशिक | महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने स्थानिक प्रशासनाने कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये देखील कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पण लॉकडाऊनमध्येही नागरिक मोठ्या प्रमाणात घरात बाहेर पडत असल्याचं दिसून येत आहे.

नाशिक शहरामध्ये विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या नियमांचं मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याने पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलीस आयुक्त दीपक पांड्ये यांनी विनाकारण फिरणाऱ्यांची गय केली जाणार नाही असं स्पष्ट केलं आहे.

नाशिक शहरामध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांकडून दंड वसूल तर केला जाणारच आहे, पण पोलीस आता पूर्वीप्रमाणे दांडुक्याचाही वापर करणार असल्याचं स्वतः आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता नाशिक शहरामध्ये विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची खैर नाही,  असंच काहीसं चित्र दिसून येत आहे.

पोलीस आयुक्त दीपक पांड्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात 40 ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार असून विनाकारण नियमांचं उल्लंघन करून लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणाऱ्या लोकांचा चांगला समाचार घेण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच सुरुवातीला लोकांना समज दिला जाईल, त्यानंतर काठीचा वापर केला जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या –

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जणू कोविडॉलॉजिस्टच; महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचे फॅमिली डॉक्टर’

“तुला चप्पलेनं मारणार, तु मला भेट आता…”; अधिकाऱ्याला धमकवणं पडलं महागात

दिलासादायक! पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली, जाणून घ्या आकडेवारी

आंतरजिल्हा प्रवासासाठी आले लाखात अर्ज; कारण वाचून पोलिसांनी तब्बल एवढे अर्ज फेटाळले

“रूग्णांना मदत करण्यास अपयश आलं तर, रात्र-रात्र झोप येत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More