बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अग्निवीरांसाठी सर्वात मोठी घोषणा, आता ‘इतका’ पगार मिळणार

दिल्ली | अग्निपथ योजनेवरून (Agneepath Scheme) देशभरातील वातावरण संतप्त झालेलं पाहायला मिळत आहे. केंद्र सरकराने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला बिहार, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांतून जोरदार विरोध केला जात आहे. त्यात सैन्य दलासाठीची ही योजना मागे घेणार नाही, अशी घोषणा केंद्राकडून करण्यात आली आहे.

आधीच्या नियमाप्रमाणे सैनिकांना 9 महिन्याचं प्रशिक्षण दिलं जात होतं. शिवाय त्यांची वेतनश्रेणीही कमी होती. मात्र, आता सैनिकांना 6 महिने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नुकत्याच जाहीर केलेल्या नवीन नोटीफिकशेनप्रमाणे, अग्निपथ ही सशस्त्र दलांसाठी नवीन एचआर मॅनेजमेंट (HR Management) योजना आहे. या योजनेमध्ये समाविष्ट उमेदवारांना अग्निवीर म्हणून संभोधलं जाणार आहे. शिवाय सैन्य भरतीसाठी आधी जवानांचे वय हे सरासरी वय वर्ष 32 होते पण आता 17 ते 21 वर्षातील उमेदवार सैन्य म्हणून भरती होऊ शकतात.

सध्या जवानांना जे जे काही मिळतंय ते सर्व त्यांना देण्यात येणार आहे. तसेच जवानांची 4 वर्ष दलात भरती करण्यात येईल. त्यांना वर्षातून 30 दिवसांची रजा मिळेल तसेच आजारी रजा देखील मिळेल. दरवर्षी पगारवाढ करण्यात येईल. जवानांचा चार वर्षानंतर स्वविधी म्हणून 10 लाख मिळतील. सोबतच आसाम रायफल्स आणि CAPF नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देखील मिळेल, असं केंद्राने स्पष्ट केलं आहे

दरम्यान, सध्या सैनिकांना कमी पगार मिळतोय पण नवीन नियमानुसार, भरती झालेल्या सैनिकांना सुमारे 30 हजार रुपये मिळणार आहेत. नव्याने भरती झालेल्या तरुणांची ऑल इंडिया स्तरावर भरती करण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या-

भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ

‘आमदारांना सातत्याने फोन येत आहेत’; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

अग्निवीरांसाठी आनंद महिंद्रांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

आजारी असतानाही मुक्ता टिळक मतदान करण्यासाठी मुंबईकडे रवाना!

‘…तर मी राष्ट्रपती होऊ शकतो’; बिचुकलेंनी सांगितलं गणित

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More