Top News जळगाव महाराष्ट्र

कृषी बिल शेतकऱ्यांच्या फायद्याचंच, त्यांनी आंदोलन थांबवावं- रक्षा खडसे

जळगाव | केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन पेटलं असून राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि इतर राज्यातील शेतकरी आंदोलनासाठी दिल्लीमध्ये गेले आहेत. अशातच भाजप खासदार रक्षा खडसे यांनी या कृषी बिलाचे समर्थन केलं आहे.

कोणीतरी शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलन करत असल्याचं रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे. राज्यातून मात्र राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांनीही शेतकऱ्यांच्या कृषी आंदोलनाला पाठींबा दिला आहे.

कृषी बिलामुळे शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. शेतकऱ्यांचे नुकसान न होणार हे कृषी बिल आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवावं, असंही रक्षा खडसे यांन म्हटलं आहे.

दरम्यान, कृषी बिल हे शेतकऱ्यांच्या हितासाठी बनवलेले आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन बंद व्हावं यासाठी कृषिमंत्रीसुद्धा वारंवार बैठका घेत असून त्यांची समजूत काढत असल्याचं रक्षा खडसे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या-

सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावाला यांना ‘एशियन ऑफ द इयर’ पुरस्कार जाहीर

“महाविकास आघाडीचे सरकार सांगून पाडणार नाही तर थेट कृती करणार”

‘राज ठाकरेंना निवडणुकीत हवं तसं यश मिळालं नाही, पण…’; शरद पवार

मुंबई महानगरपालिकेवर देखील भाजपचाच भगवा फडकणार- राम कदम

“भाजपने पराभवातून धडा घ्यायला हवा, देशात आता ईडी आणि सीबीआयचं राजकारण चालणार नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या