Agriculture Budget 2024 | शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांकडून सर्वांत मोठ्या घोषणा !

Agriculture Budget 2024 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आज (1 फेब्रुवारी) देशाचा अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget 2024) सादर केला. यंदाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी (Agriculture Budget 2024 ) सरकारने घोषणा केल्या आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

यासोबतच तरुणांसाठी आणि महिला वर्गासाठीही अर्थसंकल्पामध्ये मोठ्या योजना आखल्या आहेत. शेतकऱ्यांना पिकविमा पासून ते निर्यातीबाबत अनेक योजनासाठी मोदी सरकार प्रयत्नशील असल्याचं सीतारमण यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांसाठी केल्या 10 घोषणा

PM Kisan योजनेतून 11.8 कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत
पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकवीमा योजनेचा लाभ
दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार योजना आणणार
शेतीसाठी आधुनिक साठवणूक आणि पुरवठा साखळीवर भर देणार
सरकार मोहरी आणि भुईमूग लागवडीला अधिक प्रोत्साहन देणार
मत्स्यपालन योजनेला चालना देणार
सागरी खाद्य निर्यात दुप्पट करण्याचे लक्ष्य
सरकार 5 इंटीग्रेटेड एक्वा पार्क्स उघडणार
शेतीसाठी आधुनिक साठवण करणार

या सर्व योजना केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी (Agriculture Budget 2024 ) आखल्या आहेत. तसेच, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. आम्ही देश प्रथम या भूमिकेवर विश्वास ठेवून वाटचाल करत आहोत. शाश्वत विकासासाठी सर्वांगीण विकासाचा मार्ग आम्ही स्वीकारला आहे. 2014 पूर्वी आपण कुठे होतो आणि आत्ता आपण कुठे आहोत याकडे पाहण्याची आवश्यकता आहे. त्या वर्षांमध्ये किती गैरकारभार झाला, हे पाहून यातून धडा घेण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्र सरकार सभागृहात श्वेतपत्रिका सादर करणार असल्याचेही निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे.

अर्थमंत्र्यांच्या इतर मोठ्या घोषणा

देशात 15 नवी एम्स रुग्णालये तयार करणार
पाच एकात्मिक ॲक्वा पार्क स्थापन करणार
सौर ऊर्जा योजनेद्वारे 1 कोटी घरांना दरमहा 300 युनिट मोफत वीज देणार
पुढील दोन वर्षांत दोन कोटी घरे बांधणार
सरकार नेक्स्ट जेनरेशन रिफॉर्म आणणार
पुढच्या 5 वर्षांत गरीबांसाठी 2 कोटी घरं बांधणार

MSME साठी व्यावसाय सोपा करण्यासाठी काम सुरू
गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक क्षेत्र सज्ज
रूफटॉप सोलर प्लान अंतर्गत 1 कोटी घरांना 300 यूनिट/महिना फ्री वीज
देशात जास्तीत जास्त वैद्यकीय महाविद्यालयं सुरू करणार
डेअरी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लवकरच योजना आणणार
सर्वाइकल कॅन्सरसाठी लसीकरण वाढविलं जाईल, नॅनो डीएपीचा वापर सर्व क्षेत्रांमध्ये वाढविला जाईल.

News Title-  Agriculture Budget 2024 

महत्त्वाच्या बातम्या – 

Interim Budget 2024 | “2047 पर्यंत भारत…”, निर्मला सीतारमण यांचं मोठं वक्तव्य

Budget 2024 LIVE अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे, वाचा एकाच ठिकाणी

LPG Gas Price | अर्थसंकल्पाआधीच सर्वसामान्यांना दणका, गॅस सिलेंडरच्या दरात वाढ

Interim Budget 2024 | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

Jay Shah सलग तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष; ACC चा मोठा निर्णय