पुणे | नविन कृषी कायद्याविरोधात शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. तरीदेखील सरकारनं यावर काहीच तोडगा काढलेला नाहीय. याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार गिरीष बापट यांनी वक्तव्य केलं आहे.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांना कृषी कायद्याविषयी विचारणा केली असता, कृषि कायदे रद्द होणार नाहीत, पण त्यामध्ये काही सुधारणा केल्या जातील, असं बापट यांनी सांगितलं.
तसंच ते कायदे मागे देखील घेतले जाणार नाही यावर सरकार ठाम आहे. शेतकर्यांच्या जीवनात बदल घडविण्याच्या दृष्टीनं हे कायदे करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचं गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन सुरु आहे. डाव्या विचारसरणीचे लोक या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. हे काम सरकार अस्थिर करण्यासाठी केले जात आहे.
आपल्या राज्यातील सत्ताधारी आणि केंद्रातील काही विरोधी पक्ष या माध्यमातुन देशात अशांतता निर्माण करण्याचं काम करीत आहे. हे योग्य नसून आंदोलन शांततेच्या मार्गानं केलं पाहिजे, असं मतही बापट यांनी व्यक्त केलं.
थोडक्यात बातम्या-
“राज्य सरकारातला एक मंत्री जिरवायची भाषा करतो हे योग्य नाही”
पॉर्न पाहात असला तर सावधान; पुढचे काही दिवस सतर्क राहा, नाहीतर…
निर्वस्त्र न करता छातीला स्पर्श करणे लैंगिक अत्याचार नव्हे; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
धनंजय मुंडेंवरील बलात्काराच्या आरोपांवर पंकजा मुंडे पहिल्यांदाच बोलल्या, म्हणाल्या…