बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नरेंद्र सिंह तोमर आणि राकेश टिकैत यांच्यात जुंपली, म्हणतात…

नवी दिल्ली | भाजप हा फसवणूक करणारा पक्ष असून आम्ही भाजपला विरोध करणाऱ्यांसोबत आणि शेतकऱ्यांसोबत असल्याचं शेतकरी नेते राकेश टिकैतांनी म्हटलं होतं. यानंतर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी राकेश  टिकैतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी महापंचायतीला संबोधित केलं. यावरून केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर टिकैत यांच्यावर निशाणा साधला.

मध्य प्रदेशातील मुरैना येथे एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर टीका केली. किसान युनियनचे नेते शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांचे मुद्दे यावर तोडगा काढू शकत नाही आणि जगाचे प्रश्न सोडवण्यावर पुढाकार घेत आहेत, असा टोला तोमर यांनी लगावला.

दरम्यान, केंद्र सरकारकडून कृषी कायद्यावर चर्चा करण्यासाठी अजूनही दारे खुली आहेत. सरकार आजही चर्चा करण्यासाठी तयार आहे. चर्चेतून निश्चित मार्ग निघू शकेल. यात सर्वांचा फायदा आहे. बाकी दगडावर डोके आपटून घेण्यात काही अर्थ नाही, असं तोमर यांनी सांगितलं आहे. तसेच

थोडक्यात बातम्या-

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खलबतं; ‘या’ बड्या नेत्याचं मंत्रिपद जाणार?

प्री-माॅन्सून सिझनला सुरवात; ‘या’ राज्यात पावसाची शक्यता

महापौर निवडणुकीआधीच जळगाव महानगरपालिकेमध्ये राजकीय भूकंप?

मोठी बातमी! सचिन वाझे यांचं पोलीस दलातून निलंबन

रेल्वेच्या पुलावर मुलं उभी होती, तेवढ्यात अचानक मालगाडी आली अन्…. पाहा व्हिडिओ!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More