Top News महाराष्ट्र मुंबई

शेतकऱ्यांच्या बांधावर बी-बियाणे आणि खतं पोहचवा; कृषीमंत्र्यांचे आदेश

Loading...

मुंबई | अगोदरच पिचलेला शेतकरी कोरोनाच्या या संकटकाळात आणखीनच दबून गेला आहे. ठाकरे सरकारने या पिचलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याच्या दृष्टीने काही निर्णय घेतलेले आहेत. कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर बी-बियाणे आणि खतं पोहचवा, असे निर्देश दिले आहेत.

कृषी विभागाने याचं योग्य ते नियोजन करावं. तसंच 31 मे पूर्वी पुरवठा करण्याचे निर्देश कृषीमंत्री दादा भुसे यांनी कृषी विभागाला दिले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने हा मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे.

यावर बोलताना कृषीमंत्री म्हणाले, “येणाऱ्या खरीप हंगामाच्या पार्श्भूमीवर आणि कोरोना संकटाला तोंड देताना शेतकरी राजाला अजिबात घाबरण्याचं कारण नाही. राज्यातील सगळ्या शेतकऱ्यांना लागणारी खतं आणि बी बियाणं मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. ज्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाची काळजी लागून राहिलेली असेल त्यांनी काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. त्यांनी निर्धास्त रहावं”

पुढे बोलताना ते म्हणाले की, “शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्राचा कृषीविभाग सज्ज आहे. त्यांना लागणारी खतं आणि बियाणे अधिकारी कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर नेऊन देतील. कृषी विभागाच्या या निर्णयाने खतं असतील किंवा बियाणे असतील त्यांच्या काळाबाजाराला निश्चित आळा बसेल. कोणीही व्यापारी काळाबाजार करण्याला धजावणार नाही”.

Loading...

प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसंच तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी तसंच कृषी विभागाचे अधिकारी यांनी समन्वय साधून त्याचं नियोजन करावं. शेतकऱ्यांना खरीप हंगामात कोणतीही अडचण येऊ नये, असं नियोजन कृषी विभागाकडून अपेक्षित आहे आणि तसं नियोजन आम्ही करू, असंही दादा भुसे म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

पोलिसांनी वारंवार सांगूनही ऐकलं नाही; ‘या’ कारणामुळे पुणे पोलिसांनी पकडले ६९९ जण

“लॉकडाऊन संपण्याची चिन्हं नाहीत, हे प्रकरण मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाणार”

महत्वाच्या बातम्या-

आजपासून आणखी 5 ठिकाणी कोरोना निदान प्रयोगशाळा

राज्य सरकारचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

“लॉकडाऊन वाढवायचा की नाही याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आजच निर्णय घेतील”

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या